आॅनलाइन लोकमतजळगाव दि,२२ : पुणे, शिर्डी व जळगाव शहरात दुचाकी चोरुन त्याची रावेर तालुक्यातील गावांमध्ये कमी किमतीत विक्री करणाºया निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३८ रा. पुणे, ह.मु.अडावद, ता.चोपडा) व इरफान नबाब तडवी (रा.सहस्त्रलिंगी,ता.रावेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अडावद येथे अट्टल गुन्हेगार वास्तव्याला असून तो चोरीच्या दुचाकी रावेर तालुक्यात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक फौजदार मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, रामचंद्र बोरसे, योगेश पाटील, बापु पाटील, गफ्फार तडवी, मनोज दुसाने, सुशील पाटील, महेश पाटील व दीपक पाटील यांचे पथक चौकशीसाठी नेमले होते. या पथकाने रविवारी अडावद येथे जाऊन सापळा लावला असता निळकंठ राऊत जाळ्यात अडकला. त्याची चौकशी केली असता आणखी एका जणाचे नाव पुढे आले. पथकाने लागलीच सहस्त्रलिंगी येथे जाऊन इरफानच्याही मुसक्या आवळल्या. इरफानच्या माध्यमातून दुचाकीची विल्हेवाट लावली जात होती.राऊतवर १९ गंभीर गुन्हेपोलीस निरीक्षक कुराडे यांनी निळकंठ राऊत याची कुंडली काढली असता त्याच्यावर तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. पुण्यातील निगडी पोलीस स्टेशनला घरफोडीचे १६, नारायणगाव पोलीस स्टेशनला एटीएम फोडल्याचा एक व हिंजवडी व पिंप्री पोलीस स्टेशनला २ गुन्हे घरफोडीचे दाखल आहेत. आता जळगाव शहरातील गुन्ह्यांची भर पडली आहे.
जळगाव, पुणे येथे चोरलेल्या दुचाकींची रावेरात विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:14 PM
पुणे, शिर्डी व जळगाव शहरात दुचाकी चोरुन त्याची रावेर तालुक्यातील गावांमध्ये कमी किमतीत विक्री करणाºया निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३८ रा. पुणे, ह.मु.अडावद, ता.चोपडा) व इरफान नबाब तडवी (रा.सहस्त्रलिंगी,ता.रावेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देदोघांना अटक पाच दुचाकी जप्त एलसीबीची कारवाई