आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - सकाळी सात वाजेची वेळ. ४१८६ श्री सदस्य उपस्थित, हाती झाडू, फावडे, टोपली घेत स्वच्छता सुरु केली. पाहता पाहता १६ शासकीय कार्यालयांसह बसस्थानक परिसर व चौक चकाचक झाले. अवघ्या तीन तासात २४७ टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली. हे चित्र पहावयास मिळाले ते रविवारी सकाळी शहरातील विविध भागात. निमित्त होते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाचे.डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, १३ मे रोजी देशभरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत जळगाव शहरातही सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून या अभियानास सुरुवात झाली. आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याहस्ते नारळ वाढवून व हाती झाडू घेऊन या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे- पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.स्वच्छतेसाठी स्वयंस्फूर्तीया स्वच्छता अभियानासाठी श्री सेवक स्वयंस्फूर्तीने सरसावले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहन तळासह संपूर्ण परिसर झाडून कचरा उचलून स्वच्छता केली. शहरात विविध कार्यालयांमध्येही अशाच प्रकारे श्री सदस्यांनी स्वच्छता करीत कार्यालय परिसर चकाचक केला.रस्त्यासह दुभाजकही स्वच्छशासकीय कार्यालयांसह शहरातील रस्त्यांवरील कचरा उचलून कानेकोपरे स्वच्छ करण्यात आले. यामध्ये रस्त्यांवरील दुभाजकांमध्येही साचलेला कचरा, वाळलेली पाने, फुले उचलून दुभाजकही स्वच्छ करण्यात आले.बसस्थानकाचे पालटले रुपएरव्ही दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा असलेल्या नवीन बसस्थानकात अस्वच्छता दिसून येते, मात्र रविवारी श्री सदस्यांनी या ठिकाणीदेखील स्वच्छता अभियान राबवित या परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावली. जुन्या बसस्थानकामध्येही श्री सदस्यांनी स्वच्छता केली.या कार्यालयात केली स्वच्छताजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, सा.बां. विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामगृह, जुने व नवीन बसस्थानक, दूरध्वनी व टपाल कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, बँका, न्यायालय परिसर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वीज वितरण कार्यालय, वन विभाग, समाजकल्याण कार्यालय, पाटबंधारे कार्यालय, तलाठी कार्यालय इत्यादी कार्यालयात स्वच्छता करण्यात आली.या चौकांमध्ये स्वच्छताकाव्यरत्नावली चौक, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, शिवतीर्थ मैदान चौक, प्रभात चौक इत्यादी चौकांसह मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. एकूण ९५ कि.मी. रस्त्याची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली.१७० टन कोरडा व७७ टन ओला कचरासंकलीतया स्वच्छता अभियायात सहभागी होण्यासाठी कोणालाही आग्रह न करता प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने यात सहभागी होत ४१८६ श्री सदस्यांनी यासाठी हातभार लावला. तसेच तब्बल ७९ ट्रॅक्टर, ३० घंटागाडी, २८ इतर वाहने, असा एकूण १३७ वाहनांचा ताफा या स्वच्छता अभियानात होता. याद्वारे ७७ टन ओला तर १७० टन कोरडा असा एकूण २४७ टन कचरा उचलण्यात येऊन त्याची नेरीनाका स्मशान भूमी, साने गुरुजी रुग्णालयानजीकची जागा, विद्या फाउंडेशनच्या समोर इत्यादी ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.शिस्तबद्धरित्या राबविली मोहिमशहरातील विविध कार्यालय, चौक व रस्ते अशा विविध ठिकाणी हजारो स्वयंसेवक स्वच्छतेसाठी एकत्र आले तरी कोठेही शांततेता भंग झाला नाही की शिस्त मोडली नाही. अत्यंत शिस्तबद्धपणे प्रत्येक जण आपले कार्य करण्यात मग्न असल्याचे चित्र या अभियानातून दिसून आले व या कार्यास आपसूकच अधिकारी, पदाधिकाºयांचे ‘कर’ जुळले.ईश्वरासह समाजाची निस्वार्थ सेवाडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छतेच्या कार्यातून ईश्वरासह समाजाची निस्वार्थ सेवा घडत आहे. यामुळे घर, अंगण, कार्यालये स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा मिळून आरोग्य सदृढ राहण्यासही मदत होत असल्याचा सूर उद््घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून उमटला. अभियान संपल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगावात ३ तासात २४७ टन कचऱ्याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:31 PM
स्वच्छता अभियान
ठळक मुद्देशासकीय कार्यालयांसह विविध चौक चकाचकईश्वरासह समाजाची निस्वार्थ सेवा