यावल : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तीन रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आलेल्या आरोग्य पथकासमवेत कुटुुंबातील जावयाने वाद घालून तब्बल पाच तास रुग्णवाहिका ताटकळत ठेऊन रुग्णांना घेऊन जाण्यास प्रतिबंध करीत पोलिसांशी वाद घातल्याची घटना तालुक्यातीत मालोद येथे रविवारी घडली.विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेत नायगाव, ता.यावल येथील दोन रुग्ण होते. मालोद येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याच कुटुंबात पत्नी, मुलगी व नात यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानुसार संबंधित तिघा महिला रुग्णांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या आरोग्य पथकासमवेत कुटुंबातील जावयाने पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, असा आग्रह करीत तोपर्यंत रुग्णांना रुग्णवाहिकेत पाठविण्यास विरोध दर्शवित वाद घातला.यावेळी गावातील पोलीस पाटील तडवी यांनी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून मालोद गावातीत परिस्थितीची माहिती कळविली.पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी सुनील तायडे व विकास सोनवणे यांना मालोद गावात पाठवले व त्या बाधित आलेल्या रुग्णांच्या मनातील सभ्रम दूर केल्याने अखेर वाद निवळला. यानंतर सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान त्या तिघा रुग्णांना अखेर क्वारंटाइन करण्यात आले.
यावल तालुक्यातील मालोद येथे आरोग्य पथकाशी बाधित कुटुंबियांचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 3:54 PM
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तीन रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आलेल्या आरोग्य पथकासमवेत कुटुुंबातील जावयाने वाद घालून तब्बल पाच तास रुग्णवाहिका ताटकळत ठेऊन रुग्णांना घेऊन जाण्यास प्रतिबंध करीत पोलिसांशी वाद घातल्याची घटना तालुक्यातीत मालोद येथे रविवारी घडली.
ठळक मुद्देपोलिसांनी समजूत काढल्यावर मिटला वादअखेर बाधित कुटुंबाला केले क्वारंटाईन