शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

ड्युटी लावण्यावरून ‘आयएमए’मध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:51 AM

आज बैठक : जिल्हाधिकारी कार्यालयातच आपसात झाला गोंधळ

जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनमधील आपसातील वाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी चव्हाट्यावर आले़ कोविडसाठी गणपती रुग्णालयात फिजिशन व भुलतज्ञांचीच नेमणूक का केली गेली? या विषयावरून हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला़ याबाबत फिजिशियन व भुलतज्ञ यांची बुधवारी सकाळी ९ वाजता आयएमए सभागृहात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे़कोविडसाठी अधिग्रहीत गणपती रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टर्सची आॅनकॉल २४ तास ड्युटी लावण्यात आल्याने हा प्रकार अमानवीय असल्याचे सांगत यावर तोडगा काढावा यासाठी औषधवैद्यक शास्त्राचे डॉक्टर्स तसेच भूलतज्ञ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी पत्र दिले होते़ त्यानुसार डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते़ चर्चेसाठी येत असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला डॉक्टर्सनी समस्या मांडल्या़ बाहेर क्वारंटाई कसे राहावे, अशा विविध समस्या मांडत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जसा सोयीचा वेळ ठरवून घेतला आहे तसाच वेळ कोविडसाठीच्या खासगी रुग्णालयात का नको, तसेच सिव्हीलमध्ये काम करणाऱ्यांनी इकडे काम करावे, असा सूर उमटल्यानंतर आयएमएच्या पदाधिकाºयांसोबत हा वाद झाला़ यात डॉ़ राधेश्याम चौधरी यांनी मध्यस्ती करीत हा वाद सोडविला़ कोविडसाठी छातीच्या आजाराचे तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ यांचाच अधिक उपयोग असल्याने त्यांच्या ड्युटी लावण्यात आल्याचेही सांगण्यात येत होते़ आॅन कॉल २४ व सलग पाच दिवस कोविडच्या कालावधीत शक्य होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़बैठक घेऊन ठरवा... शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आयएमच्या डॉक्टर्सनी याबाबत बैठक घेऊन नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.डॉक्टरांमध्ये भीतीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वुद्धेच्या मृत्यूनंतर डॉक्टर्स कारवाई करण्यात आल्याने डॉक्टर्समध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही एका पदाधिकाºयांनी सांगितले़ प्रामाणिक काम करूनही कारवाई होत असल्याने डॉक्टर्समधून असा सूर उमटत असून अशा वातावरणात काम कसे करावे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव