यावल, जि.जळगाव : साकळी युनिट अंतर्गत वीज वितरण कंपनीची नऊ ग्रामपंचायतीच्या २० पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाची तीन कोटी ३३ लाख रुपयाची थकाबाकी आहे. या थकबाकीपोटी २० पैकी १७ पाणीपुरवठा करणाºया पंपाचा वीजपुरवठा खंंिडत करण्यात आल्याची माहिती साकळीचे सहाय्यक अभियंता डी.डी.महाजन यांनी दिली.वीज वितरण कंपनीच्या साकळी युनिट अंतर्गत साकळी, शिरसाड, मनवेल, पिळोदे, थोरगव्हाण, शिरागड, चुंचाळे, बोराळे, वाघोदे या नऊ ग्रामपंचायती आहे. या सर्व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाºया पंपाचे २० वीज कनेक्शन आहेत. त्यांच्यावर वीज वितरण कंपनीची तीन कोटी ३३ लाख रुपये एवढी थकबाकी आहे.या थकबाकीसाठी वसुली मोहीम राबविली जात आहे. थकबाकीपोटी वीसपैकी १७ पाणीपुरवठा पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सूचना देऊनही या ग्रामपंचायतीतर्फे थकबाकीचा भरणा करण्यात आला नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.पाणीपुरवठा ठप्पया ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाºया पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. थकबाकीदार ग्रामपंचायतींनी त्यांंच्याकडील असलेल्या थकबाकीचा भरणा करून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील नऊ ग्रा.पं.च्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:16 AM
यावल, जि.जळगाव : साकळी युनिट अंतर्गत वीज वितरण कंपनीची नऊ ग्रामपंचायतीच्या २० पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाची तीन कोटी ३३ लाख ...
ठळक मुद्दे३ कोटी ३३ लाखाची थकबाकीपाण्यासाठी नागरिकांचे हालथकीत भरणा करण्याचे वीज कंपनीचे आवाहन