आॅनलाईन लोकमतचोपडा, दि. ५ : नगरपालिकेत ५ रोजी विशेष सभा होती. मात्र सत्ताधारी विकास मंचच्या २१ नगरसेवकांपैकी नाराज असलेल्या दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे पाठ फिरवित एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथे जात गणेश दर्शन घेतले. चोपडा नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेत विविध समिती सदस्यांचे नामनिर्देशन होणार होते. मात्र सत्ताधारी विकास मंच मध्ये उघड उघड फूट पडल्याने नऊ नगरसेवक आणि एक सहयोगी नगरसेवक बाहेर गावी रवाना झाले होते. मात्र असे असले तरी उर्वरित सत्ताधारी विकास मंचच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन विविध समिती सदस्यांना नाम निर्देशित केले आहे .सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने सभा तहकूब होण्याची नामुष्की मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थिती दिल्यामुळे सध्यातरी टळली आहे. कोणत्याही निर्णयात विचारात घेतले जात नाही व कामकाजात मनमानी चालते, फक्त दोन ते तीन लोकच नगर पालिका चालवितात असा आरोप करीत या नगरसेवकांनी पाठ फिरविली.चोपडा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र मिळून विकास मंचतर्फे निवडणूक लढविली होती. त्यात विकास मंचतर्फे वीस नगरसेवक आणि एक अपक्ष निवडून आलेले आहेत. परंतु विकास मंच चे सहयोगी सदस्य असे २१ नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडलेले आहेत. सत्ताधारी विकास मंच च्या नगरसेवकांमध्ये उघड उघड दोन गट पडल्याने दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे पाठ फिरवून बहिष्कार टाकला. त्यानंतर पद्मालय येथे दर्शन घेण्यासाठी निघून गेले होते.विशेष सभेत पाणीपुरवठा समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती, महिला व बालकल्याण समिती व इतर समित्यांसाठी सदस्य निर्देशित केले जाणार होते. मात्र नाराज नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट निर्माण करून आज सभेच्या ठिकाणी न जाता बाहेर गावी जाणे पसंत केले. यामुळे सत्ताधारी विकास मंचमध्ये फूट पडली आहे.सभेचे पीठासन अधिकारी तथा तहसीलदार दीपक गिरासे होते. तर त्यांना साहाय्य मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले. सभेला लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषा चौधरी, हितेंद्र देशमुख, रमेश शिंदे, कृष्णा पवार, गटनेते जीवन चौधरी, रुक्साना शाईन सय्यद काझी, भूपेंद्र गुजराथी, उपनगराध्यक्षा सीमा श्रावगी, दीपाली चौधरी, नसीम बानो जहिरोद्दीन, हुसैन खाँ पठाण खा, प्रकाश मोहन पाटील, अश्विनी गुजराथी तर शिवसेनेचे गटनेते महेश पवार, किशोर चौधरी, राजाराम पाटील, महेंद्र धनगर, लताबाई पाटील, मिनाबाई शिरसाठ उपस्थित होते.हे नगरसेवक गेले पद्मालय येथे देवदर्शनालानाराज असलेले सुप्रिया सनेर, सुरेखा माळी, विमलबाई साळुंखे, शोभाबाई देशमुख, कैलास सोनवणे, सरला शिरसाठ, अशोक बाविस्कर, गजेंद्र्र जयस्वाल, नारायण बोरोले, डॉ.रवींद्र पाटील हे १० नगरसेवक पद्मालय येथे चतुर्थीनिमित्त दर्शन घेण्यास गेले होते. तर शिवसेनेच्या संध्या महाजन आणि मनीषा जयस्वाल या दोन नगरसेविका अनुपस्थित होत्या.
चोपडा विकास मंचच्या नाराज दहा नगरसेवकांनी विशेष सभेकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:11 PM
विशेष सभेला दांडी मारत नगरसेवक पद्मालय येथे गणेश दर्शनाला
ठळक मुद्देचोपडा नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजनसत्ताधारी विकास मंचच्या नगरसेवकांमध्ये उघड दोन गटनाराज असलेले नगरसेवक गेले पद्मालय येथे देवदर्शनाला