सभेवरच चर्चा
जळगाव : २२ मार्च रोजी होणारी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन याबाबत चर्चा सुरू असून याबाबत अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही. मात्र, सभांबाबत लवकरच प्रशासकीय आदेश येणार असल्याचे सांगण्यात आले असून प्रशासकीय सूचनांनुसारच ही सभा घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
घरकुल मिळण्याची मागणी
जळगाव : डांभुर्णी ता. यावल येथील रोहिदास पंडित पाटील यांनी घरकूलाचा लाभ मिळत नसल्याने जि. प. प्रशासनाला निवेदन दिले आहे. २०१८ मध्ये आईच्या नावाने घरकूल मंजूर झाले होते. आईचे निधन झाल्यानंतर मी वारस असतानाही अद्याप घरकूलाचा लाभ मिळाले नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
संपास पाठिंबा
जळगाव : बँक कर्मचाऱ्यांच्या संपास राष्ट्रवादी महिला आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशभरात बँक कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निषधे व संपास पांठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा कल्पना पाटील यांनी दिली आहे.