जळगाव : जिल्ह्यात बुधवारी १४ हजार ५०० लसींचे वाटप करण्यात आले आहे. त्या लसींचा डोस जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर पोहोचवण्यात आला आहे. त्यानुसार आता गुरुवारी जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे.
रेडक्रॉसचे केंद्र सकाळी बंद; तर दुपारी सुरू
रेडक्रॉसच्या लसीकरण केंद्रावर सकाळी लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र, नंतर आरोग्य यंत्रणेने या लसीकरण केंद्रावर दुपारी ३०० लसींचे डोस पाठवले. त्यानंतर तेथे लसीकरण सुरळीत पार पडले.
कोट -
लसींचा साठा आला की, तो केंद्रांवर पाठवला जात आहे. सध्या कोविशिल्डचा जो साठा येणार आहे. त्यातून दुसरा डोस पूर्ण केला जाणार आहे. त्यात पहिला डोस आता दिला जाणार नाही. तसेच कोवॅक्सिन देखील मिळालेली नाही. जेव्हा मिळेल तेव्हा त्याचाही दुसरा डोस दिला जाणार आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक