जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार ६३० शेतकऱ्यांना ८१५ कोटी १४ लाख रुपये खरीप हंगामासाठीचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा हे फक्त ५१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे.
जळगाव जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे १ हजार ६१४ कोटी ९ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ८१५ कोटी १४ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आतापर्यंत ५१ टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ १ लाख ४८ हजार ६३० शेतकऱ्यांना झाला आहे.
तर नाशिक विभागात ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा हे १० टक्के अधिक कर्ज वाटप झाले आहे.
धुळे जिल्ह्यात ६८४ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी २८६ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ ३० हजार ५८६ शेतकऱ्यांना झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत २३० कोटी ९४ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. त्यापैकी ४१ टक्के कर्ज वाटप झाले. पीक कर्जाचा लाभ १९ हजार ६६१ शेतकऱ्यांना झाला आहे.