रोकडे गावाला लागून असलेल्या डोगरी नदीला पूर आल्याने नदीकाठावर आदिवासी कुटुंबाची घरे व संसाराचे साहित्य वाहून गेले आहे. आदिवासी कुटुंबाना १ रोजी रोकडे तांडा येथील शाळेत रयत सेनेच्या वतीने ब्लॅंंकेट वाटप करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो पशुधन मृत्युमुखी पडले तर शेत व घरांचे अतोनात नुकसान झाले असून अशा संकटप्रसंगी रयत सेनेच्यावतीने तालुक्यातील रोकडे तांडा जि. प. शाळेत वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबाना ब्लॅंंकेट वाटप करण्यात आले. यावेळी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, अध्यक्ष संतोष निकुंभ, प्रदेश कार्याध्यक्ष सुमित भोसले, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, रोकडे व रयत सेना अध्यक्ष अमोल पाटील, उद्देश शिंदे, मनोज भोसले आदी उपस्थित होते.