कजगाव : भडगाव येथील तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभिमान अंतर्गत १ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध प्रकारचे विक्रमी २९६८ दाखले वितरित करण्यात आले. तालुक्यात विविध घटकांना या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांसंदर्भात महसूल विभागाअंतर्गत कार्यालयाशी नियमित संबंध येतो. विद्यार्थी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्यात गेल्या चार वर्षांत सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत सरासरी १६०० दाखल्याचे दरमहा वाटप करण्यात येते.
भडगाव तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 11:14 PM