भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे दिवाळीसारख्या सणात गावातून काही मदत मिळेल या आशेने गावातील बसस्थानक चौकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराजवळ आलेल्या आदिवासी बांधवांना अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे कपडे, फराळ देऊन माणुसकीची हाक देण्यात आली.कामानिमित्त पोटाची खळगी भरण्यासाठी साकेगावात दिवाळीसारख्या सणात काही मदत मिळेल, पोटाची खळगी भरेल या आशेने हनुमान मंदिरासमोरील उकिरड्यावर १२ जणांचे मुलांसह कुटुंब गेल्या सहा-सात दिवसांपासून आलेले आहे. कडाक्याच्या थंडीत खाली जमिनीवर पांघरण्यासाठी काही नाही, अंगावर कपडे नाही, जेवण नाही याची माहिती अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांना कळताच सदस्यांनी सर्व १२ जणांना फराळ, नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.‘वाटीभर फराळ अन् नवीन कपडे देऊन वंचितांची दिवाळी गोड करू या’ हे ब्रीद घेऊन प्रतिष्ठानने यंदा हा उपक्रम राबवला. त्यात जी मदत गोळा झाली ती गरजूंपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांत पोहोचवण्यात आली.मोलमजुरी करून जीवनाचा गाडा हाकणाºया कुटुंबात अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे मदत करण्यात आली. सण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो असूनही नसल्यासारखा असतो. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांची भेट घेऊन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप केले.या उपक्रमाचा लाभ चार पुरुष, चार मुले, दोन मुली, दोन महिला अशा १२ जणांना मिळाला. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, योगेश इंगळे, संदीप रायभोले, जीवन महाजन, भूषण झोपे, जीवन सपकाळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
साकेगाव येथे ‘अंतर्नाद’तर्फे दिवाळीत गरीब कुटुंबीयांना कपडे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 5:34 PM
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे आदिवासी बांधवांना अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे कपडे, फराळ देऊन माणुसकीची हाक देण्यात आली.
ठळक मुद्देसण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो गरिबांसाठी असूनही नसल्यासारखा असतो.प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली.त्यानंतर रविवारी सकाळी त्यांची भेट घेऊन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप केले.