भुसावळ तालुक्यातील सुसरी आणि पिंपळगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर घुले, सुसरी येथे सरपंच ऊर्मिला पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नयना पाटील मुख्याध्यापिका दीपाली भंगाळे, यांची उपस्थिती होती, तर पिंपळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील, ग्रा.पं. सदस्य नारायण कोलते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कृष्णा शिंदे, मुख्याध्यापक सुनीता महाजन, यांची उपस्थिती होती. प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प प्रमुख भूषण झोपे यांनी उपक्रमाचा उद्देश सांगितला तर आभार सहसमन्वयक विक्रांत चौधरी यांनी मानले. भुसावळ अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ सोनवणे या उपक्रमाचे कौतुक केले.
९५ विद्यार्थ्यांना लाभ
शिक्षिका मीरा जंगले, शारदा सुरवाडे यांच्यासह योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, समाधान जाधव, सुभाष इंगळे, अमित चौधरी, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या ९५ विद्यार्थ्यांना पाट्या, वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, रंगपेटी, पट्टी असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून गणेशोत्सवाला या सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. अंतर्नादचे सदस्य हे स्वत: आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.