शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

रेकॉर्ड नसलेल्या गटांनाही जिल्हा दूध संघाकडून नफ्याचे वितरण

By admin | Published: April 15, 2017 10:24 AM

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने अधिकृत सदस्य नसलेल्या आणि विशेषत: सहकार विभागाकडे संबंधित गटांचा कुठलाही तपशील नसलेल्या जवळपास 250 खाजगी दूध पुरवठादार गटांनाही नफा, फरक आदींचे वितरण केले आहे.

 जळगाव,दि.15-जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने अधिकृत सदस्य नसलेल्या आणि विशेषत: सहकार विभागाकडे संबंधित गटांचा कुठलाही तपशील नसलेल्या जवळपास 250 खाजगी दूध पुरवठादार गटांनाही नफा, फरक आदींचे वितरण केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

जे दूधपुरवठा दूध संघाला करतात त्यांना संघाशी जोडून ठेवणे, त्यांना लाभ मिळवून देणे संघाची जबाबदारी, संकेत आहे, पण ही जबाबदारी, संकेत निभावण्याच्या नावाखाली ज्या दूधपुरवठादार गटांकडे दूधपुरवठाबाबतचा तपशील अधिकृत नाही.. गटाकडे किती सदस्य व नेमके किती लाभार्थी याची व्यवस्थित माहिती नाही.. आवक जावक यासंबंधीच्या नोंदी, रजिस्टर नाहीत.., अशा गटांनाही नफा, फरक याचे वितरण झाले. हे वितरण करताना संघातील जबाबदार  व्यक्तींनी दुर्लक्ष केले.. हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करून.. वितरित झालेल्या नफ्यातील मलिदा मटकावला.. संघाची कोटीच्या घरात फसवणूक अशा प्रकारातून झाल्याचा दावा दूध संघातील माजी सुरक्षा अधिकारी एन.जे.पाटील यांनी केली आहे. 
एका संचालकाच्या नातेवाइकाला व्हाऊचरने 35 हजार वेतन
दूध संघात ठेका पद्धतीने रूजू झालेल्या एका संचालकाच्या नातेवाईक कर्मचा:याला काही महिन्यातच 35 हजार रुपये वेतन व्हाऊचरने दिले जात असल्याची तक्रार एन.जे.पाटील यांनी केली आहे. 
भविष्य निधीही भरला नाही
दूध संघात ठेका पद्धतीने ज्या कर्मचा:यांची नियुक्ती केली त्यातील अनेक कर्मचा:यांच्या भविष्य निधीची (पीएफ) रक्कम अनेक महिने भरली नाही. या प्रकारास  ठेकेदार जबाबदार आहेत. हा प्रकार कसा झाला.., याबाबत आपण कामगार आयुक्त व कामगार मंत्री यांच्याकडेही तक्रार केल्याचे एन.जे.पाटील म्हणाले. 
सीबीआय चौकशीची मागणी 
दूध संघाचे कामकाज एनडीडीबीने बेकायदेशीरपणे चालविल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) करावा यासंबंधीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे 27 मे 2016 व 16 जून 2016 रोजी एन.जे.पाटील यांनी केली. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात 15 ऑक्टोबर 2016 रोजी पोलीस महासंचालक यांना अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले. पोलीस महासंचालक यांनी 29 सप्टेंबर 2016 रोजी संबंधित अर्ज पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे पाठवून अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले. परंतु पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अर्जाबाबत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरीही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच शहर पोलिसात दाखल 114 आरोपींविरूद्धच्या गुन्ह्याचा तपासही केलेला नाही. कुणालाही अटक केली नाही. त्यामुळे शहर पोलिसात दूध संघाच्या संदर्भात दाखल असलेल्या गुन्हा क्र.182/2013 चा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी मागणी एन.जे.पाटील यांनी राज्याच्या गृह विभागाकडेही शुक्रवारी एक पत्र पाठवून केली आहे.