ठळक मुद्देसोबतच मास्कचेही वितरणअनपेक्षित मिळालेल्या मदतीने चेहऱ्यावर समाधान
शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : डॉ.सागर गरुड व सिद्धार्थ लुनिया मित्र परिवाराच्या सहकाऱ्यांनी सोमवारी शेंदुर्णीमधील विविध भागातील गरजू गरीब तसेच विधवा व अपंग व्यक्तींच्या कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतक्या पॅकिंग किराणा मालाचे वाटप करण्यात आले. सोबतच मास्क व हात धुण्यासाठी साबणदेखील देण्यात आले. या वेळी एकूण २५० गरजू कुटुंबातील सदस्यांच्या चेहºयावर अपेक्षा नसताना मिळालेल्या मदतीमुळे वेगळेच समाधान समाधान दिसून आले. या वेळी गावातील मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.