शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून, गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व बेडची अत्यंत आवश्यकता आहे. सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये फुल्ल आहेत. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे, म्हणून सेवारथ संस्थेने गंभीर रुग्णांसाठी उपयुक्त असे २५ मशीन सिव्हिल हॉस्पिटलला देण्याचा संकल्प करीत या मशीनचे वाटप केले.
प्रकल्प यशस्वितेसाठी सेवारथ परिवाराचे प्रमुख दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी प्रयत्न केले. सदर कार्यात अपर्णा मकासरे, अनिता कांकरिया, ज्योत्स्ना रायसोनी, रोटरी क्लब जळगाव, रोटरी क्लब मिडटाऊन, रोटरी क्लब वेस्ट, रोटरी क्लब सेंट्रल, श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार मंडल व अनेक दानशूर सेवाभावी संस्थांनी सहकार्य केले आहे. विष्णु भंगाळे, महेंद्र गांधी, अपर्णा भट, जितेंद्र ढाके, डॉ. तुषार फिरके, योगेश गांधी, डॉ. रेखा महाजन, के. बी. वर्मा, महेंद्र रायसोनी, योगेश वाणी आदी उपस्थित होते.