अमळनेर, जि.जळगाव : पंचायत समितीचा शिक्षण विभाग व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलतर्फे यांच्यातर्फे झालेल्या ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण करण्यात आले. माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी यांच्या प्रमुखत्वाखाली कार्यक्रम झाला.माजी आमदार शिरीष चौधरी, नोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयदीप पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, डॉ.कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विभागप्रमुख मनीषा चौधरी, प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, स्वामी विवेकानंद स्कूलचे अध्यक्ष प्रा.डी.डी.पाटील, सी.ए.नीरज अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी आर डी.महाजन, समन्वयक व शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, शालेय पोषण आहार अधीक्षक बी.पी.चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, नगरसेवक बाळासाहेब संदानशिव, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एम.ए.पाटील, केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए.धनगर, साने गुरुजी पतपेढीचे तुषार पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे.पाटील, केंद्रप्रमुख राजेंद्रसिंग पाटील, मंगला पाटील, शरद सोनवणे, पी.एस.विंचूरकर, स्वामी विवेकानंद स्कुलचे प्राचार्य गणेश मितपल्लीवार, रवींद्र चौधरी, नवनीत राजपूत, नवनीत सपकाळे, शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांची भाषणे झाली.रवींद्र पाटील, रोहांशू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे, दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे व शरद पाटील यांनी आभार मानले.निकाल असा-प्राथमिक विद्यार्थी गट : प्रथम- अक्षर अग्रवाल, यज्ञेश बडगुजर (स्वामी विवेकानंद स्कूल), द्वितीय- भुश्रा पिंजारी (बालाजी विद्यालय, गांधली- पिळोदे), तृतीय- चंद्रकांत निकुंभ (शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे), उत्तेजनार्थ- नलिनी पाटील (साने गुरुजी कन्या विद्यालय), मसिरा नाझ (अलफैज उर्दू शाळा),माध्यमिक विद्यार्थी गट : प्रथम- वेदांत पाटील (सेंट मेरी स्कूल), द्वितीय- हर्शल पाटील, भावेश पवार (विजयनाना पाटील आर्मी स्कूल), तृतीय- किरण लोहार (पीबीए इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ- यश चौधरी (आदर्श विद्यालय, अमळगाव), संघमेध ब्रह्मे (सार्वजनिक विद्यालय, सारबेटे), प्राथमिक शिक्षक गट- प्रथम- तुषार देवरे (जि. प. शाळा, मारवड), द्वितीय- तसनीम बानो शफीक अहंमद (जि. प. उर्दू शाळा), तृतीय- कविता पाटील (जि. प. शाळा, जैतपीर), माध्यमिक शिक्षक गट : प्रथम- उमेश काटे (विजयनाना पाटील आर्मी स्कूल), द्वितीय- रशिदा जावेद (स्वामी विवेकानंद स्कूल), प्रयोगशाळा सहायक : प्रथम- प्रेरणा अमृतकर (स्वामी विवेकानंद स्कूल). रवींद्र चौधरी (पाचोरा), नवनीत राजपूत (चोपडा), नवनीत सपकाळे (धरणगाव), शैलेंद्र चव्हाण (चहार्डी) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
अमळनेरात विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 4:07 PM