शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

धरणगावात गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 4:07 PM

धरणगाव येथील मुन्नादेवी अ‍ॅण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चंदेल यांच्या पुण्यस्मरणार्थ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटण्यात आले.

ठळक मुद्देसुरेश चंदेल यांच्या स्मरणार्थ राबविला उपक्रममुन्नादेवी अ‍ॅण्ड मंगलादेवी संस्थेने घेतले १५ विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक

धरणगाव, जि.जळगाव : येथील मुन्नादेवी अ‍ॅण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चंदेल यांच्या पुण्यस्मरणार्थ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटण्यात आले. येथील राजपूत समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक जीवनसिंह बयस हे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे, कडूसिंह बयस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सी.के. पाटील, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, पत्रकार भरत चौधरी, उद्योजक नयन गुजराथी, नीलेश चौधरी, भुराजी बयस गोविंदसिग, शिवसेना संघटक धीरेंद्र्र पुरभे, गटनेते कैलास माळी, जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक शरदकुमार बन्सी, विनोद रोकडे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शहरातील पी.आर., बालकवी, इंदिरा गांधी, म.फुले, आदर्श विद्यालय, उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गावातील एकूण १५ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी फाउंडेशनने घेतली.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिºहाडे, भरतकुमार चौधरी, गटनेते कैलास माळी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त गुण संपादन करावे, असे म्हटले यावेळी भरत चौधरी, भाजप गटनेते कैलास माळी, आर.बी.पाटील, पी.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जीवन बयस यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक जितेंद्र बयस यांनी केले. सूत्रसंचालन गणेशसिंह सूर्यवंशी यांनी, तर आभार धींरेंद्र पुरभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाली बयस, यशपाल चंदेल, संकेत चंदेल, मोहनिश चंदेल, पंकज बयस, जितू बयस, हर्षल बयस यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणDharangaonधरणगाव