चोपडा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय युवा परिषद, चोपडा टिमतर्फे भार्डू (ता.चोपडा) येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू अशा ३५ विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वातून क्रीडा व शालेय साहित्य मोफत वितरण करण्यात आले.यात प्रत्येकी २ वह्या तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी १ कॅरम बोर्ड व २ बॅटमिंटन संच आदी क्रीडा साहित्य देखील शाळेस भेट देण्यात आले.बालगोपाळ चिमुकल्यांना खाऊ व साहित्य वाटप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.प्रास्ताविक तालूकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले.अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अॅड.एस.डी.सोनवणे होते.प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा पंचायत समितीचे सदस्य भरत बाविस्कर, युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, रतन मोरे, विकास पाटील, वसंतराव पाटील, रोहिदास सोनवणे, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, महेश पाटील, हिलाल पाटील, मुख्याध्यापिका शैला सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.प्राथमिक शिक्षिका रेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गावातील संभाजी पाटील, दिपक पाटील, राहुल पाटील, सुधाकर सोनार, संदीप पाटील, भिकन पाटील, शिवाजी पाटील, बाळू बोरसे, आकाश पाटील, किरण पाटील, विवेक बोरसे, विठ्ठल पाटील, अशोक पाटील, पंकज पाटील, मनोज पाटील, राहुल बोरसे आदी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका समन्वयक अश्विनी सोनवणे यांनी केले तर आभार तालुका समन्वयक रोहन सोनवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी युवा परिषदेचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील, शैलेश धनगर, रोहन सोनवणे, अश्विनी सोनवणे, किरण चौधरी, स्टुडंट ऑलिंपिक असोसिएशनच्या तालुका सचिव अश्विनी पाटील, परेश पवार, पीयूष माळी यांनी परिश्रम घेतले.
युवा परिषदेतर्फे भार्डू शाळेत क्रीडा व शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 3:24 PM