आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१७ : आंतरराष्ट्रीय व्यापारी धोरणाचे खोटे कारण पुढे करीत शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानकडून साखर खरेदी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांचे वाहन अडवून त्यांना स्वदेशी साखर भेट देण्यात आली.राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहर महानगराध्यक्षा तेजस्विनी झांबरे, जिल्हा सचिव गौरव वाणी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, अक्षय वंजारी, शुभम येशी, सौरभ जाधव, भावेश पाटील, अमोल वराडे, वर्षा पाटील,दर्शना चौधरी, प्रशांत चौधरी, गणेश निंबाळकर यांनी सहभाग घेतला.पाकिस्तानकडून साखर खरेदी करीत सरकारने भारतीय सैनिकांच्या व नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दाऊदला परत आणण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधानांनी खोटी आश्वासने जनतेला देत, पाकिस्तानातून साखर आणली. शेतकºयांकडे दुर्लक्ष करीत शासन साखर उद्योगाला अडचणीत आणत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.आंदोलना दरम्यान शिवाजी पुतळा परिसरातून आमदार सुरेश भोळे हे आपल्या वाहनाने जात होते. आंदोलकांनी त्यांचे वाहन थांबवून त्यांना स्वदेशी साखर भेट दिली. सुमारे पाऊण तास हे आंदोलन चालले. यावेळी राष्ट्रवादी युवक व युवती काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगावात गिरीश महाजनांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे साखर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 7:14 PM
राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांचे वाहन अडवून त्यांना स्वदेशी साखर भेट देण्यात आली.
ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनजळगावचे आमदार सुरेश भोळे यांना दिली साखरशासनाच्या कृतीचा केला निषेध