जळगाव : पाळधी, ता.धरणगाव येथे शनिवारी तालुक्यातील गरजूंना विविध स्वरूपात वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेतर्फे मदत करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे, मॅनेजर अनिल बल्लूरकर, विजय राऊत, रतिलाल वळवी, एकात्मिक बाल विकास अधिकारी संजय धनगर, माजी सभापती अनिल पाटील, प्रकाश पाटील, विजेश पवार, शिक्षक सेनेचे नाना पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.विजय बागुल यांनी केले, तर आभार रतिलाल वळवी यांनी मानले.
या वर्षी धरणगाव तालुक्यात १ कोटी ७१ लाखांचा निधी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मागणीनुसार मंजूर केला आहे. यातील २३ गावांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात काही गावांतील पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. वर्ल्ड व्हिजन इंडिया कंपनीने धरणगाव तालुक्यातील ७५० कुटुंबांना धान्य, ६३ कुटुंबांना सौर कंदील प्रदान करण्यात आले. अडीचशे कुपोषित बालकांसाठी धान्य, २० अंगणवाड्यांना बेबी चेअर्स, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.