जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट अशी त्रिसूत्री राबवणार असल्याचे जाहीर केले. मात्र यातील पहिली पायरी म्हणजे रुग्ण शोधणे आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णाच्या काम करण्याच्या ठिकाणीदेखील तपासणी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप त्याकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेले नसल्याचेच चित्र दिसत आहे.
गेल्या दीड महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहे. त्यातही गंभीर असलेल्या रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्या पातळीवर मोठे काम करावे लागत आहे. असे असले तरी रुग्ण शोध मोहिमेतील पहिली पायरी असलेल्या ‘ट्रेसिंग’वर प्रशासनाला जास्त काम करावे लागणार आहे. प्रत्येक व्यक्ती दिवसाला जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी
सहकाऱ्यांसमवेत घालवते. त्यामुळे एखादी व्यक्ती जर पॉझिटिव्ह आली तर त्यांच्या कामाच्या जागी जाऊन इतर सहकाऱ्यांची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. याकडे मात्र सध्याच्या परिस्थितीत दुर्लक्ष होत आहे.
औद्योगिक वसाहतीकडे दुर्लक्ष
औद्योगिक वसाहतीत असलेले कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्या कार्यालयातील इतर सहकाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात नसल्याचे बहुतेक वेळा
निदर्शनास आले आहे. तसेच शहराबाहेर असलेल्या काही मोठ्या कंपन्यांमध्येदेखील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास इतर सहकाऱ्यांची चाचणी करण्यास
टाळाटाळ केली जाते.
पॉझिटिव्ह हजाराच्या तर चाचण्या १० हजारांच्या पार
दररोज नवे बाधित हे हजारापेक्षा जास्त आहेत. त्या प्रमाणात चाचण्यादेखील जास्त होत आहेत. बुधवारी तर या चाचण्यांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला. त्यात अँटीजेन चाचण्याचे प्रमाण जास्त होते. असे असले तरी काही ठिकाणी गरज असूनही चाचणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये काही ठिकाणी मागे पडत असल्याचे काही अधिकारी खासगीत मान्यदेखील करतात.
आकडेवारी
एकूण कोरोना रुग्ण
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
गृहविलगीकरणातील रुग्ण
एकूण कोरोना बळी