आनंद सुरवाडे ।जळगाव : मृत्यूदरात देशापेक्षा चारपटीने पुढे असलेला जळगाव जिल्हा रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मात्र देशाच्या तुलनेत सहा टक्क्यांनी मागे आहे़ जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १४ जूनपर्यंत ४४़ ५ टक्के आहे़ उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण बरे होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याने आता आरोग्य व्यवस्थेच्या विस्कटलेल्या घडीमुळे हे प्रमाण वाढल्याचा सूर उमटत आहे़ रुग्ण संख्या अगदीच झपाट्याने वाढत असल्याने हे गंभीर चित्र निर्माण झाले आहे़मार्च महिन्यात केवळ एकच रुग्ण होता़ एप्रिलच्या अखेरपर्यंत तो रुग्णही बरा होऊ घरी गेला होता़ बरे होणाºयांचे प्रमाण शंभर टक्के होते़ मात्र, अचानक कोरोनाचे वादळ आले व १८ एप्रिलपासून कोरोनचा संसर्ग वाढायला सुरूवात झाली़अतिशय झपाट्याने रुग्ण समोर येऊ लागले़ एप्रिलच्या अखेरीस ३१ रुग्ण होऊन एकच रुग्ण बरा झालेला होता़ त्यानंतर नियमित रुग्ण वाढू लागले आणि जळगावचे नाव देशभर गाजू लागले.रूग्णांसोबतच मृत्यू होणाºयांचे प्रमाणही वाढतच आहे़ वाढत वाढत ही संख्या १४१ वर पोहचली आहे़ जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत़ शहरातील मृत्यूचा दरही अन्य तालुक्यांक्याचा तुलनेत कमी आहे़बरे होणाºयांपेक्षा रुग वाढले दुप्पटजळगावात रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे़ यात गेल्या चौदा दिवसात तब्बल १ हजार ३६ रुग्णांची वाढ झाली आहे. याच कालावधीत ५२२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाºयांपेक्षा दुप्पटीने रुग्ण वाढल्याने रुग्णालयांवरचा ताण वाढत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळेच बरे होणाºया रुग्णांचा एकत्रित दर हा १४ जूनपर्यंत ४४़ ५ टक्के आहे़दहा दिवसांनी सुटी... सुरूवातीला बाधितांचे चौदा व पंधराव्या दिवशी स्वॅब घेऊन त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्याचा निर्णय घे तला जात होता़ मात्र, केंद्रीय आरोग्य विभागाच्या नवीन सूचनांनुसार बाधित रुग्णांना दहा दिवसांपैकी शेवटच्या तीन दिवसात लक्षणे नसल्यास होम क्वारंटाईनच्या सूचना देत घरी सोडण्यात येते.जळगावा शहरातील कोविड केअर सेंटरमधील बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे़ २०२ रुग्ण बरे होऊन परतले आहेत़ (आकडेवारी १४ जूनपर्यंतची आहे)
जिल्हा मृत्यूदरात पुढे, रुग्ण बरे होण्यात मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:30 PM