बोदवड, जि.जळगाव : जिल्हा बँकेच्या बोदवड शाखेत कर्मचाºयाची बनावट स्वाक्षरी करून त्याच्या कर्जखात्यातून परस्पर दोन लाख ७० हजार ८०० रुपये रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सूत्रांनुसार, जिल्हा बँकेच्या बोदवड शाखेत वीज बिल भरणा केंद्रावर कार्यरत असलेले निलंबित कारकून रमेश यादव तेलंग (वय ५७) यांनी बोदवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ७ जुलै २०१७ रोजी जिल्हा बँकेच्या बोदवड शाखेचे व्यवस्थापक दशरथ गोविंदा पाटील, कारकून अशोक भोपलू इंगळे व रोखपाल तुळशीराम भगवान पाटील यांनी संगनमत करीत आपल्या खात्यात १०० रुपये उसने मागितले. तेव्हा तेलंग यांनी खात्यात असलेल्या रकमेतून स्लिप भरून दिली. त्या स्लिपवर खाडाखोड करीत त्यातील कर्ज खात्यात असलेली रक्कम दोन लाख ७० हजार ८०० रुपये काढून अपहार केला आहे. हा प्रकार लक्षात आल्याने तेलंग यांनी जळगाव येथील बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र जयंतराव देशमुख व बँकेचे जळगाव येथील व्यस्थापक प्रमुख भरत रामदास पाटील यांच्याकडे चार वेळा तक्रार दिली. त्यांनीही कोणतीच कार्यवाही न करता उलटपक्षी फिर्यादी रमेश तेलंग यांनाच निलंबित करून कार्यमुक्त केले.याबाबत रमेश तेलंग यांनी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री ननवटे यांच्याकडे ही कैफियत मांडली. तेव्हा त्यांनी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून जिल्हा बँक बोदवड शाखा व्यवस्थापक दशरथ गोविंदा पाटील, कारकून अशोक भोपलू इंगळे, रोखपाल तुळशीराम भगवान पाटील, जळगाव येथील बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र जयंतराव देशमुख व बँकेचे जळगाव येथील व्यस्थापक प्रमुख भरत रामदास पाटील या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,दरम्यान, यापूर्वीही जिल्हा बँकेच्या बोदवड शाखेत अपहार प्रकरण गाजले असून, हे दुसरे प्रकरण घडले आहे.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यानेच केली कर्मचाºयाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 9:31 PM
जिल्हा बँकेच्या बोदवड शाखेत कर्मचाºयाची बनावट स्वाक्षरी करून त्याच्या कर्जखात्यातून परस्पर दोन लाख ७० हजार ८०० रुपये रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देजिल्हा बँकेच्या बोदवड शाखेतील प्रकारदोन लाख ७० हजारांची रोकड परस्पर काढली खात्यातूनपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल