जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या खटल्यांची संख्या त्यामुळे जिल्हाभरातून न्यायालयात येणाºया पक्षकारांची संख्या देखील वाढली आहे. त्यातच वकीलांची संख्या देखील वाढली असून, वकील कक्षात अपुर्ण पडणारी जागा, यामुळे जिल्हा न्यायालयाचा अवाका वाढणार असून, शहरातील ट्रॅफीक गार्डनच्या जागेवर जिल्हा न्यायालयाचे नवीन बांधकाम होणार आहे. यासाठी मनपाने ३ आॅगस्ट रोजी झालेल्या महासभेत मंजुरी दिली आहे.शहरातील ट्रॅफीक गार्डनची जागा जिल्हा व सत्र न्यायालयाने नवीन इमारत बांधण्यासाठी मनपा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, या जागेवर मालकी हक्क महाराष्टÑ शासनाचा असल्याने काही प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यात मनपा प्रशासनाने मनपा व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाची कार्यवाही करून ही जागा न्यायालयासाठी आरक्षीत करण्यासाठी महासभेपुढे प्रस्ताव ठेवला होता. ३ आॅगस्ट रोजी झालेल्या महासभेत या जागेवर उद्यान व सिव्हीक सेंटरचे असलेले आरक्षण रद्द करून जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठीची मंजुरी देण्यात आली आहे.नागरिकांसाठी ठरणार सोईचेन्यायालयाकडून अनेक जागांची पडताळणी करण्यात आली होती. यासाठी पोलीस मुख्यालयाची व अजिंठा चौकालगत असलेल्या भंगार बाजाराची जागेसाठी देखील न्यायालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही ठिकाण सध्यस्थितीत असलेल्या न्यायालयापासून दुर गेले असते. त्यामुळे या दोन्हीही ठिकाणांवर न्यायालयाने विचार केला नाही. ट्रॅफीक गार्डनची जागा सध्याचा न्यायालयाचा जागेपासून जास्त दूर नसून, बसस्थानक व रेल्वे स्टेशनपासून देखील सोईची आहे. त्यामुळेच या जागेसाठी न्यायालयाने मनपाकडे प्रस्ताव पाठविला होता.भूसंपादनाच्या विषयांवर मागविल्या हरकती३ आॅगस्ट रोजी झालेल्या महासभेत भूसंपादनाचे एकूण सहा विषयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी तीन विषयांसह ७ डिसेंबर रोजी झालेल्या भूसंपासनाच्या विषयांबाबत नागरिकांना काही हरकती असल्यास मनपा प्रशासनाने त्या मागविल्या आहेत. नागरिकांना आपल्या हरकती देण्याबाबत मनपाने महिनाभराची मुदत दिली आहे. तसेच महासभेने घेतलेला ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविताना नागरिकांनी घेतलेल्या हरकतींचा देखील विचार केला जाणार असल्याचे मनपाने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.
खटल्यांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा न्यायालयही विस्तारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:03 PM