ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10- शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून याबाबतचा करार मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी झाला. या निर्णयामुळे प्रगत वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीदेखील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाले आहेत. जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकूल उभारण्यात येणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये केली होती. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकाच ठिकाणी किमान 50 हेक्टर जागा मिळावी असा प्रस्ताव होता. त्यानुसार तीन ठिकाणच्या जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पथकाने बघून कुसुंबा येथे जागा निश्चित केली आहे. 46.56 हेक्टर जागेत हे शासकीय एकात्मिक वैद्यकीय संकूल उभारण्यात येणार आहे.
आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागात झाला करारजिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता सार्वजनिक आरोग्य विभाग (जिल्हा शल्य चिकित्सक) व वैद्यकीय शिक्षण विभाग (अधिष्ठाता) यांच्यात मंगळवारी करार झाला. हा करार केवळ तीन वर्षासाठी राहणार आहे. त्यानंतर हा करार आपोआप संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या 13 वैद्यकीय अधिका:यांना या पूर्वीच आरोग्य विभागातून कार्यमुक्त करण्यात आले असून या करारानंतर आता वैद्यकीय अधिका:यांसह सर्व तांत्रिक कर्मचारी, परिचारिकादेखील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाले आहेत.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक वगळता सर्व अधिकारी (डॉक्टर) वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाल्याने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील हे आता वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहणार आहे.
जिल्हा रुग्णालयापासून सुरूवात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले जिल्हा रुग्णालय हे 12 एकरात उभारण्यात आले आहे. 400 खाटांचे हे रुग्णालय असून या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या व दुस:या वर्षाच्या विद्याथ्र्याना शिक्षण देणे प्रस्तावित आहे. सद्य स्थितीत जिल्हा रुग्णालयाची ही जागा आरोग्य विभागाकडे आहे. मात्र आता येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असल्याने ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा गेल्या महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात आला होता.
1260 कोटी 60 लाख निधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे संकूल उभारण्यास गती मिळणार आहे. या संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुव्रेद महाविद्यालय, 50 विद्यार्थी क्षमतेचे दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय, 40 विद्यार्थी क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय राहणार आहे. या संकुलाच्या उभारणीतून आधुनिक तसेच प्राचीन भारतीय वैद्यकीय चिकित्सा पद्धतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळणार आहे.
असे चालणार कामकाजरुग्णालय इमारतीतील 5000 चौ.फूट जागा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प्रशासकीय कार्यालय इत्यादीसाठी व 5000 चौ. फूट जागा ही औषध भांडारसाठी असे एकूण 10 हजार चौ. फूट क्षेत्र आरोग्य विभागाकडे व उर्वरित जागा करार सुरू असेर्पयत अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली राहणार आहे. कार्यालयीन व रुग्णालयीन प्रशिक्षण विभाग, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय हे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीत तर उर्वरित सर्व विभागाचे अधिष्ठातांच्या अखत्यारीत कामकाज चालेल. यामध्ये नेत्र विभाग व नेत्र पथक हे पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत राहण्यासह अपंगत्व तपासणी मंडळ गट अ व ब अधिका:यांसाठीची मंडळेदेखील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत राहतील.
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून याबाबतचा आज करार झाला. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.