आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२५-उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून युवारंग महोत्सवाचे स्वरुप यंदापासून बदलणार आहे. आविष्कार स्पर्धेप्रमाणेच युवारंग महोत्सवाचे आयोजन देखील जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय प्रमाणे होणार आहे. खान्देशात पाच ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन होणार असून, जास्तीत जास्त महाविद्यालयांचा युवारंग महोत्सवात सहभाग वाढावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हा बदल करण्यात आल्याची माहिती उमविचे विद्यार्र्थी कल्याण विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाकडून दरवर्षी ३ ते ४ दिवस चालणाºया युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत झालेल्या युवारंग महोत्सवात उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होत असत. उमवि कार्यक्षेत्रात सुमारे २१० महाविद्यालये येतात मात्र प्रत्यक्षात या स्पर्धेत १०० ते १२० महाविद्यालयांचे विद्यार्थीच सहभागी व्हायचे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग या महोत्सवात व्हावा यासाठीच जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यापीठाकडून युवारंग महोत्सवाच्या आयोजनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २२ लाख रुपयांची तरतुद केली आहे.
एकाच महाविद्यालयावर पडायचा बोझायुवारंग महोत्सवासाठी खान्देशाातील केवळ एका महाविद्यालयाकडून युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. यामुळे या महाविद्यालयात ३ ते ४ दिवस सुमारे ३ हजारहून अधिक विद्यार्थी मुक्कामी राहत होते. त्यांचा निवासाची व जेवनाची व्यवस्था महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत होती. या सर्व आयोजनामुळे आयोजन करणाºया महाविद्यालयावर मोठा आर्थिक बोझा पडत होता. त्यामुळे गेल्यावर्षी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात झालेल्या युवारंग महोत्सवादरम्यानच जिल्हास्तरीय महोत्सवाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली होती.
विद्यापीठाने मागविले महाविद्यालयांकडून प्रस्तावयावर्षापासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जिल्हास्तरीय युवारंगाचे आयोजन होईल. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात विद्यापीठ व जिल्ह्यातील एका महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवारंगाचे आयोजन करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या जास्त असल्याने जळगावात दोन ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय युवारंग महोत्सवात विजयी झालेल्या काही महाविद्यालयांचा संघ विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवासाठी पात्र ठरणार आहेत. जानेवारी महिन्यातच या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाकडून युवारंग महोत्सव आयोजनासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची महिती प्रा.एस.टी.इंगळे यांनी दिली.
कोट..युवारंग महोत्सवात नंदुरबार, धुळे, चोपडा व यावल अशा दुर्गम भागातील महाविद्यालयांचाही सहभाग वाढावा यासाठी जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्याचा अखेरपर्यंत युवारंग महोत्सव घेण्यात येईल.-प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग,उमवि