जळगाव : जिल्हास्तरीय युवा महोत्सव शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला. हा महोत्सव यंदा ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. त्यात सात प्रकारात १२ स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पंचांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शलाका निकम, भूषण चव्हाण, शुभांगी बडगुजर, डॉ. अपर्णा भट, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय पवार, तेजस मराठे, शुभांगी बडगुजर, योगेश पाटील, हर्षल पाटील, उल्हास ठाकरे, योगेश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी या सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती लावली. तर क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, राजेंद्र चव्हाण, एम.के. पाटील यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. तांत्रिक सहाय सुशील तळवेलकर, उमेश मराठे संजय महिरे, विनोद माने यांनी केले.
विजेते -
शास्त्रीय गायन - रोहित अंभोरे, देवेन हेलोडे, वरुण नेवे, शास्त्रीय नृत्य (कथ्थक) - संकेत वारुळकर, शास्त्रीय वाद्य बासरी - दर्शन वसईकर, प्रसाद मोराणकर, देव जाधव, पारस सोनार,
लोकनृत्य - भवरलाल ॲण्ड कांताई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगाव तबला - योगेंद्र पाटील, वक्तृत्व राहुल बागडे, एकांकिका - भाग्यदीप थिएटर्स, कहानी किसान की.