जळगाव : जिल्हा दूध संघातर्फे दरवर्षी उत्कृष्ठ काम करणाऱ्या विविध संस्था व दूध पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ७ दूध उत्पादक संस्थांना तर ३ सर्वात जास्त दूध पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दि. ३० सप्टेंबर रोजी दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे पुरस्कार जाहीर झाले नव्हते. यावर्षी दूध संघाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी दूध संघाच्या संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची सभा ठरणार आहे.
या संस्थांना मिळाले पुरस्कार
- मागील पाच वर्षांत उत्कृष्ठ काम करणारी संस्था - गजानन दूध उत्पादक संस्था, कासोदा
- उत्कृष्ठ कामकाज करणारी संस्था - प्रथम - कैलास दूध उत्पादक सहकारी सोसायटी, तारखेडा खु., द्वितीय - एकुलती बु. दूध उत्पादक सहकारी सोसायटी, भडगाव, तृतीय - भादली बु. दूध उत्पादक सहकारी सोसायटी.
- विकासलक्ष्मी पुरस्कार - निमखेडी महिला दूध उत्पादक संस्था, ता. जामनेर
- जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे - किरण मुकुंदराव पाटील, चहार्डी, ता. चोपडा, शरद तुकाराम महाजन, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर
- कृत्रिम रेतन तंत्रज्ञ - शंकर काशिनाथ वाणा, तारखेडा खु., ता. पाचोरा
- दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणारी संस्था - सावदा दूध उत्पादक सहकारी सोसायटी, ता. रावेर
- विकास पशुखाद्य खरेदी करणार संस्था - आदर्श दूध उत्पादक सहकारी सोसायटी, बामणोद