जळगाव : आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर निवडल्या जाणा:या सभापतीपदासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली. 12 ठिकाणी चक्रानुक्रमानुसार, तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या दोन व सर्वसाधारण महिला या तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील 15 पैकी 9 पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापतीपद 13 मार्च 2017 पासून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, ग्रामपंचायत शाखेचे नायब तहसीलदार सुभाष सोनवणे उपस्थित होते.सुरुवातीला जिल्हाधिका:यांनी 15 पंचायत समित्यांमध्ये असलेले सद्य:स्थितीचे आरक्षण आणि चक्रानुक्रमे आरक्षणाची पद्धत समजावून सांगितली. शासनाने पंचायत समितीनुसार निश्चित केलेल्या आरक्षित जागांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती या जागांच्या पदासाठी एकूण लोकसंख्येची टक्केवारी उतरत्या क्रमाने लावून आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सन 1995 ते 2017 या दरम्यान चक्रानुक्रमानुसार आरक्षणाची माहिती घेण्यात येऊन आज नवीन आरक्षण घोषित करण्यात आले. ही प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन सभापतीपदासाठी, तर सर्वसाधारण महिला या एका पदासाठी अशा तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली.9 पंचायत समित्यांमध्ये महिला राजशुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर 9 पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे. त्यात जळगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर, धरणगाव, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव या पंचायत समित्यांचा समावेश आहे. त्यात अनुसूचित जाती महिला 1, अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जमाती महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 2, सर्वसाधारण 3, सर्वसाधारण महिला 4 अशा जागा आहेत.
जिल्ह्यात 15 पैकी 9 पं.स.मध्ये ‘महिला राज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 12:26 AM