जळगाव : पंचायत राज संस्थेतील ग्राम स्वराज्य अभियांतर्गत जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकारी यांचा चमू अभ्यास दौºयासाठी हिमाचल प्रदेशात रवाना झाला आहे.हिमाचल प्रदेशात आयोजित हा दौरा ग्राम स्वराज्य अभियांतर्गत असून दौरा आटोपल्यानंतर संबंधीत अधिकारी व पदाधिकाºयांना आपला अहवाल शासनाचा ग्रामीण विकास विभाग व यशदा पुणे येथील सत्र संचालकांना पाठवावयाचा आहे. १० ते १६ फेब्रुवारी असा या अभ्यास दौºयाचा कालावधी आहे.यांचा आहे समावेशया दौºयात जि.प.तील उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, यावलचे गट विकास अधिकारी किशोर छन्नु सपकाळे, जि.प. सदस्या प्रा.डॉ. नीलम शशिकांत पाटील, कल्पना दिनेश पाटील, कर्जाणे ता. चोपडा ग्रा.पं.चे सरपंच प्रकाश बारेला, जि.प.तील कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे यांचा समावेश आहे. पुणे येथून हे अधिकारी व पदाधिकारी विमानाने रवाना झाले आहेत. या अभ्यास दौºयाचा उपयोग जिल्हा परिषदेच्या दैनंदिन व लोकापयोगी कामात व्हावा, यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
जि.प.चे अधिकारी, पदाधिकारी ‘हिमाचल’ दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:06 AM
दौरा ग्राम स्वराज्य अभियांतर्गत
ठळक मुद्देअभ्यास दौरा