हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेत गैरप्रकार समोर येणे नेहमीचेच झाले आहे. अनेक प्रकरणात अधिकाºयांचा हात असल्याची ओरड होत असताना त्यांच्यावर मात्र कारवाई होत नसल्याने हे प्रकार कमी न होता वाढतच चालले आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाºयांकडेही आता संशयाची सुई वळली आहे. एका सर्वसाधारण सभेत एका सदस्याने तर याबाबत थेट आरोप केला होता. परंतु उपयोग हा शून्यच झाला. एकंदरीत अधिकाºयांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे हा गैरप्रकारांचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने आता ‘यावर’ कडक कारवाईची शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. याबाबतचे सुतोवाच सुमारे महिनाभरापूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. जिल्हा परिषदेतील काही अधिकारी ठेकेदारी आणि गैरप्रकार करीत असल्याचे सांगत स्वत: गिरीश महाजन यांंनी मनमानी करणाºया या अधिकाºयांवर कडक कारवाई करावी लागेल.... लवकरच यांची बैठक घेवू असे विधान केले होते. यामुळे ही कारवाई लवकरात लवकर करुन जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे.
जि. प. त ‘स्वच्छता’ अभियान राबविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:55 PM
सर्वसाधारण सभेत एका सदस्याने तर याबाबत थेट आरोप केला होता.
ठळक मुद्दे गैरप्रकारांचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला