हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेच्या विविध अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल सदस्यांकडून नेहमीच ओरड होत असते. ही ओरड योग्य असल्याचे पदाधिकारीही मान्य करतात. एवढेच नाही तर सर्वसाधारण सभेत हे विषयही येतात. यावेळी संबंधिताना सूचना देवू असे वरिष्ठ अधिकारी आश्वासन देवून वेळ मारुन नेतात परंतु संबंधित विषय सुटतच नाही, अशी स्थिती जिल्हा परिषदेत निर्माण झाली आहे.गेल्यावेळी झालेली सर्व साधारण सभा आणि त्या आधी झालेली सभा या दोन सभांमधील विषय पाहता अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असताना त्यांच्यावर कारवाई टाळली जात असल्यानेच अधिकारी हे बिनधास्तपणे मनमानी कारभार करीत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.गेल्या एका सभेत ग्राम पंचयतींना दिलेल्या कर्जाचा प्रश्न उपस्थित झाला होता. जिल्हा ग्रामविकास निधीमधून ग्राम पंचायतींना आतापर्यंत दिलेल्या कर्जाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वसुली मात्र होत नसतानाही २८ रोजी होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन ग्रामपंचायतींना कर्ज देण्याचा प्रस्ताव ठेवला जात आहे. या थकबाकीवर आधीच्या सभेत वादळी चर्चा झाली आहे. वसुली झाली पाहिजे किंवा थेट अनुदानातून कपात व्हावी, असे देखील काही सदस्यांनी सुचविले आहे मात्र वसुलीची कार्यवाही तर होतच नाही परंतु पुन्हा पहुर कसबे व मेणगाव येथील ग्रा.पं ना कर्ज देण्याचा प्रस्ताव सादर होत आहे.एकीकडे ओरड होवूनही वसुली करणे तर दूरच मात्र आणखी दोन ग्रामपंचायतींना कर्ज देण्याचा प्रस्ताव आलाच कसा? हा महत्वाचा प्रश्न आहे. सदस्य उणिवांवर बोट ठेवतात मात्र अधिकारी दुर्लक्षच करतात. एवढेच नाही तर त्याना जे करायचे तेच करीत राहतात, हेच यावरुन दिसून येते. तुम्ही कितीही ओरडा... आम्हाला काही घेणेदेणे नाही, असे अधिकाºयांकडून कामकाज सुरु आहे काही वेळेस पदाधिकाºयांचीही त्यांना साथ लाभते. मात्र हीबाब नक्कीच चुकीची आहे, आणि हे प्रकार थांबणे गरजेचे आहे.
जि. प. चे अधिकारी झाले डोईजड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:36 PM
प्रश्नांचा निपटारा होईना
ठळक मुद्देचाललाय मनमानी कारभारएकीकडे ओरड होवूनही वसुली करणे तर दूरच