शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

नागरिकांनी साथ दिल्यास जिल्हा कोरानामुक्तच राहील - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:40 PM

‘लोकमत’च्या मुलाखतीत उपाययोजनांची माहिती, परिस्थिती नियंत्रणात

जळगाव : जिल्हाभरात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले होते़ अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेने पूर्ण दक्षता घेऊन त्यांचे कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करून परिस्थिती नियंत्रणात आणली़ पहिल्या रुग्णाचाही अहवालही निगेटीव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त म्हणू शकतो, मात्र, यात लॉकडाउनचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे़ शासकीय रुग्णालयात सध्या पूर्ण कॉर्पोरेट रुग्णालयासारख्या सुविधा आहे़़, स्थानिक पातळ्यांवर कोव्हीड केअर सेंटरचे नियोजन आहे, त्यामुळे नागरिकांनी साथ दिल्यास जिल्हा आगामी काळात कोरोनामुक्तच राहील, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे़ त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध उपाययोजनांची माहिती दिली़प्रश्न : सद्यस्थितीत परिस्थिती कशी व आपल्याकडे उपाययोजना कशा?उत्तर : पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याने शिवाय तो राहत असलेल्या परिसरातही कोणालाही लक्षणे नाहीत, त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, असे म्हणता येईल़ आपल्या जिल्ह्यात २५२ लोक परदेशातून आलेले होते़ त्यांचा चौदा दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी संपलेला आहे़ यासह ५० हजारांपर्यंत विविध बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतरित झालेले परतले आहेत़ त्यांच्या तपासण्या झाल्या असून कोणाला लक्षणे नाहीत़प्रश्न : संशयितांच्या मृतांचा आकडा वाढत आहे, कारण काय?उत्तर : सारी अर्थात सिव्हीअर अ‍ॅक्युड रेस्पीरेटरी इलनेस या आजाराची लक्षणे ही कोव्हीड सारखीच असतात़ या आजाराचा प्रार्दुभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आढळत आहे़ अशा स्थितीत या आजाराचे रुग्णही कोरोना संशयितच मानले जातात़ मात्र, त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह असतात़ प्रतिकारक क्षमता कमी असणे, अन्य व्याधी असणे, शिवाय अगदी गंभीरावस्थेत दाखल ही मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची परिस्थिती होती़ मात्र, त्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, लवकर उपचार घ्यावेत़प्रश्न : अहवालास होणाऱ्या विलंबाने काय परिणाम होतात?उत्तर : धुळ्यात किट व काही तांत्रिक अडचणी होत्यात शिवाय तपासण्यां अधिक असल्याने लोड होता़ औरंगाबादलाही हीच परिस्थिती होती़ त्यामुळे अहवालास विलंब झाला़ यामुळे संबंधित रुग्ण व नातेवाईकांच्या मानसिकस्थितीवर परिणाम होतो़ आरोग्य कर्मचाऱ्यांना तर सेवा द्यावीच लागते़प्रश्न : कोरोना रुग्णालय कुठपर्यंत राहील?उत्तर : मार्चच्या सुरुवातीला भारतात तीन रुग्ण होते़ दीड महिन्यात तो आकडा साडेनऊ हजारांवर गेला अशा स्थितीत लॉकडाऊनचे पालन न केल्यास हा प्रार्दुभाव अतिशय वेगाने होऊ शकतो़ त्यामुळे परिस्थित नियंत्रणात येईपर्यंत हे रुग्णालय कोरोना रुग्णालय राहील, त्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी असेल़

टॅग्स :Jalgaonजळगाव