ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22- दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण होते. रिअल इस्टेट क्षेत्रातही उलाढाल वाढली असून नवीन घर खरेदीस चांगला प्रतिसाद राहिला. दिवाळीच्या काळामध्ये शहरात 50च्यावर घरांची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच व्यवसायासाठी तयार दुकान अथवा तशा जागांच्या खरेदीकडेही कल वाढत असल्याचे सांगण्यात आले. नवरात्रोत्सव व विजयादशमीपासून बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण होऊन घरांच्या खरेदीमध्येही उत्साह वाढला. नोटाबंदीनंतर जवळपास वर्षभरानंतर या क्षेत्रात चांगले वातावरण तयार झाले आहे.
रिअल इस्टेटमध्ये बदलतोय ट्रेंडरिअल इस्टेट क्षेत्रात रहिवासी घरासोबतच आता व्यावसायिक जागांकडेही कल वाढत असल्याचे चित्र आहे. राहण्यासाठी घर तर असावेच, सोबतच आता व्यवसाय करण्याच्या दृष्टीने दुकानांचा शोध घेतला जात आहे. मोक्याच्या जागा पाहून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दुकान अथना मोकळ्य़ा जागांबाबत विचारणा करण्यात येत असून दिवाळीमध्येही यासाठी चांगला प्रतिसाद राहिल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीमध्ये इतर वस्तू खरेदीला प्राधान्यसाधारणत: घरांची खरेदी वर्षातील गुडीपाडवा, अक्षयतृतीया अथवा विजयादशमी या मुहूर्तावर अधिक केली जाते. दिवाळीमध्ये घरातील इतर वस्तू, वाहन, सोने-चांदी खरेदीला प्राधान्य असते. त्यामुळे घरांची जास्त खरेदी होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वर्षभरानंतर पुन्हा उत्साहाचे वातावरण गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर रियल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी पसरली व या क्षेत्रात कधी नव्हे एवढे चिंतेचे वातावरण पसरले. हातचा पैसा गेल्याने यातील गुंतवणूक थांबली व बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले. मात्र आता वर्षभरानंतर पुन्हा घर खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. जळगावात तयार घरांसह जमिनीला चांगली मागणी असल्याने या व्यवसायाने चांगले प्रस्थ तयार केलेले आहे. मात्र वर्षभरात यामध्ये काहीसी मरगळ आलेली होती. आता हे सर्व वातावरण निवळले असून विजयादशमीपासून यात पूर्ववैभव येण्यास सुरुवात झाली. दिवाळीमध्येही खरेदीचा उत्साह कायम राहिला.
व्याजदर कमी झाल्याचा फायदा सध्या बँकाचे गृहकर्जासाठीचे व्याजदरही कमी आहे. त्याचाही फायदा घेतला जात असून सामान्यांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विजयादशमीपासून घर खरेदीसाठी चांगले वातावरण असून दिवाळीमध्ये चांगला प्रतिसाद राहिला. - श्रीकांत खटोड, बांधकाम व्यावसायिक.
रिअल इस्टेटमध्ये आता व्यावसायिक जागांकडेही कल वाढत असून दिवाळीमध्ये त्याबाबत अधिकपसंतीदिसूनआली.-विनय पारख, संचालक पीपीआरएल.