शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

पाच वर्षात दिवाळीची उलाढाल पोहचली दुप्पटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:26 PM

सुवर्ण बाजार, वाहन, बांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, कापड बाजारात उत्साह

जळगाव : यंदा नवरात्रोत्सवापासून बाजारपेठेत असलेला उत्साह अद्यापही कायम असून यंदा सुवर्ण बाजार, वाहन, बांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजारातही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर २०१५पासून ते २०१९पर्यंत दिवाळीची उलाढाल दुप्पटीवर पोहचली आहे. २०१५मध्ये दिवाळीची उलाढाल १०० कोटी रुपयांची होती ती दरवर्षी वाढत जाऊन २०१९मध्ये १९० कोटींवर पोहचली आहे. यंदा पावसाने अडथळा आणल्याने त्याचा परिणाम झाला, अन्यथा ही उलाढाल आणखी वाढली असती, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. यंदा नवरात्रोत्सवापासून शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या. तेव्हापासून अद्यापही सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी कायम आहे. या सोबतच दुचाकी, चारचाकींना मोठी मागणी राहिली तर घर खरेदीतही ६० कोटींची उलाढाल होऊन कापड बाजारातही मोठा उत्साह दिसून आला.योजनांमुळे ग्राहकांनी खरेदी झाली सुलभगेल्या काही वर्षांपासून वाढत्या स्पर्धा व विविध कंपन्यांची विक्रीची चढाओढ यामुळे वेगवेगळ््या योजना तसेच सहज पतपुरवठा उपलब्ध होऊ लागल्याने विविध वस्तूंची खरेदी सुलभ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरेदीही जोरात होऊ लागल्याने पाच वर्षांत उलाढालीचा आकडा जवळपास दुपटीवर पोहचला आहे.१०० ते १९० कोटींचा पल्लावाढत्या खरेदीमुळे उलाढालीचा आलेख दरवर्षी चढाच असल्याचे दिसून येते. २०१५मध्ये दिवाळीची उलाढाल १०० कोटी रुपयांची झाली होती. त्यानंतर २०१६मध्ये ही उलाढाल दीडपटीने वाढून ती १५० कोटी रुपयांवर पोहचली. २०१७मध्ये १६५ कोटींचा पल्ला दिवाळीच्या उलाढालीने गाठला व २०१८मध्ये १६५ कोटी रुपयांवर ही उलाढाल पोहचली. त्यानंतर यंदा तर त्यात थेट २५ कोटी रुपयांची वाढ होऊन ही उलाढाल १९० कोटी रुपयांवर पोहचली आहे.नोटाबंदी, जीएसटी, ह्यरेराह्णनंतर मोठी झेप२०१६मध्ये नोटाबंदीचा निर्णय झाला. मात्र तोपर्यंत त्या वर्षीची दिवाळी झालेली होती. मात्र वर्षभर नोटाबंदीच्या झळा कायम राहिल्या. यात सुवर्ण बाजार, बांधकाम क्षेत्र चांगलेच होरपळून निघाले होते. सोबतच इतरही बाजारपेठेवर परिणाम झाला होता. नोटाबंदी पाठोपाठ २०१७मध्ये जीएसटीची अंमलबजावणी झाली व त्या नंतर पुन्हा बांधकाम क्षेत्रासाठी ह्यरेराह्णची अंमलबजावणी लागू करण्यात आली. या सर्वांमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. तरीदेखील दरवर्षी दिवाळीची उलाढाल वाढत गेली. यंदा तर या सर्वांमधून बाजारपेठ सावरली व उलाढाल १९० कोटींवर पोहचल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.सोन्याची उलाढाल ६५ कोटींवरसोने व्यवसायातील एकूण विक्रीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नसला तरी शहरातील १५०च्यावर असलेल्या सुवर्णपेढ्यांमध्ये दिवाळीच्या हंगामात ६५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.दुचाकी व चारचाकींना मोठी मागणी राहिली. दीपोत्सव काळात १५०० दुचाकींची विक्री झाली. या सोबतच या हंगामात ४५०चारचाकी विक्री झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातदेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एलईडीला सर्वात जास्त मागणी असून त्या खालोखाल फ्रीज व वॉशिंगमशीनला मागणी राहिली. सोबतच एसी, मोबाईल यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामध्ये जवळपास १५ कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. दिवाळीच्या काळात जवळपास ४०० जणांनी घराची खरेदी केली. घर खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात होती. यासाठी कुटुंबासह अनेकजण येऊन शाळा, महाविद्यालय व इतर सोयींचा विचार करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी केली. यातून जवळपास ६० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.कापड बाजारतही उत्साहसण-उत्सव म्हटले म्हणजे प्रत्येक जण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार दिवाळीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. तसेच फटाके व पुजेचे साहित्य, फराळ आदीची खरेदी सुमारे ५ कोटींची झाल्याचे सांगण्यात येत आहे.घर खरेदीसाठी यंदा चांगला उत्साह आहे. गेल्या काही वर्षात घरांची खरेदी कमी झाली होती. मात्र यंदा घरांना चांगलीच मागणी राहिली. यात १० ते ३० लाखापर्यंतच्या घरांना जास्त मागणी आहे.- वर्धमान भंडारी, बांधकाम व्यावसायिकदिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घेण्यासह सोन्यात गुंतवणूक वाढविल्याने यंदा सकारात्मक परिणाम आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.यंदा सोन्यामध्ये कधी नव्हे एवढी उलाढाल झाली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात भाव वाढूनही सोन्यात मोठी उलाढाल झाली. नोटाबंदीनंतरही सर्वात चांगली धनत्रयोदशी यंदा राहिली.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.यंदा दिवाळीच्या काळात चारचाकी खरेदीसाठी मोठा प्रतिसाद राहिला. धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज या मुहूर्तावर चारचाकींची खरेदी चांगली झाली.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.यंदा दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली. गेल्या काही वर्षांची तुलना पाहता यंदा चांगलीच मागणी राहिली.- योगेश चौधरी, दुचाकी विक्रेते.कपड्यांना तशी नेहमीच मागणी असते. नोटाबंदी, जीएसटी व इतर कारणांनी काहीसा परिणाम झाला होता. तरीदेखील दरवर्षी कापड खरेदी वाढत गेली. चार-पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी तर उलाढाल सर्वात जास्त राहिली.- ओमप्रकाश कौरानी.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव