चोपडा, जि.जळगाव : मध्य प्रदेशातील काही ग्रामस्थ बोरअजंटी परिसरातील वनजमिनीवर येऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत. त्यामुळे आमचे उदरनिवार्हाचे साधन गेले आहे. वृक्षतोडीमुळे पडणाºया पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, याचा दुष्परिणाम गावकºयांना भोगावा लागत असल्याने बोअजंटी येथील वनदावे मंजूर करू नये ही मागणी बोअजंटी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांकडे दिले.निवेदनात म्हटले आहे की, वन हक्क कायदा २००५ अंतर्गत गावातून वनदावे दाखल केले आहेत. सदर दावे दाखल करणारे बोरअजंटी येथील रहिवासी नसून चार ते पाच वर्षांपूर्वी त्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांची बोरअजंटी येथे जन्मनोंद नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वी ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आले आहेत आणि शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केले आह,े हे अतिक्रमण आमच्या विकासास बाधक आहे. गावालगत जंगल हे आमचे वैभव असून दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जंगल तोडून तेथे शेती तयार केली आहे. त्यामुळे आमचे वैभव हिरावून घेतले आहे म्हणून अतिक्रमणधारकांकडे स्वत:च्या जमिनी असूनही या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळे ते वनांचा नाश करत आहेत. तसेच या जंगल तोडीमुळे आमचे उदरनिवार्हाचे साधन हिरावून घेतले आहे. जनावरांना चरायला जंगलात जागा नाही. त्यामुळे पावसाचे पाणीही कमी पडू लागले आहे. वेळोवेळी शासनाला ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र अतिक्रमण काढले जात नाही. उलट शासन दावे मागत असते ग्रामसभेचा ठराव मागते, हे चुकीच्या असून, अशा लोकांना वनदावे मंजूर करू नयेत या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर सुनील कोळी, रतीलाल कोळी, युवराज कोळी, पोपट कोळी, हरेश्वर पाटील, पंडित पाटील, हरिओम पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.
बोरअजंटी येथे वनदावे मंजूर करू नयेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:31 PM