पीक कर्जासाठी हजार कोटींचा प्रस्ताव पाठविणारऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- जिल्हा बँकेच्या तोटय़ात असलेल्या 10 शाखा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी शनिवारी दुपारी झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी केली. दरम्यान,आगामी खरीप हंगामाच्या पीक कर्जासाठी 1 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे पाठविण्यात येणार असल्याचे अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर यांनी सांगितले.
शेतकरी हितासाठी शाखा सुरू ठेवाजिल्हा बँकेच्या 10 शाखा तोटय़ात असल्याने त्या बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. मात्र या शाखा बंद केल्याने अनेक गावांमधील शेतक:यांची गैरसोय होईल. त्यामुळे त्या बंद करू नये, अशी मागणी बँकेचे संचालक चिमणराव पाटील यांनी केली. या बाबत सकारात्मक विचार घेण्यात येईल, असे अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितल्याचे चिमणराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नोकर भरती लवकरात लवकर कराजिल्हा बँकेत नोकर भरतीला मंजुरी मिळालेली आहे. सध्या अनेक ठिकाणी कर्मचारी कमी असल्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे ही नोकर भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी संचालकांची आहे. मात्र या बाबत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर अध्यक्षा रोहिणी खडसे यांना पत्रकारांनी विचारले असता, ठोस उत्तर मिळाले नाही. मात्र व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी अहमदनगर जिल्हा बँकेतील स्थितीचा उल्लेख करीत सावधानता बाळगली जात असल्याचे सांगितले.
राज्य बँकेकडे एक हजार कोटींची मागणीआगामी हंगामासाठी पीक कर्जासाठी राज्य बँकेकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
87 हजार शेतक-यांना 434 कोटींची कजर्माफी शेतकरी कजर्माफी योजनेंतर्गत जिल्ह्यात 87 हजार शेतक:यांना 434 कोटींची कजर्माफी देण्यात आली असून शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत 45 शेतक:यांना 119 कोटींचे अनुदान देण्यात आले.
वसंत साखर कारखाना सुरू करण्याबाबत विचाराधीनवसंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्याबाबत स्थानिकांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
एकनाथराव खडसे यांची अनुपस्थितीजिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीस माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक एकनाथराव खडसे हे आजच्या बैठकीस हजर नव्हते.