शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

लाखोंच्या सौंदर्य प्रसाधनावर डल्ला

By admin | Published: January 06, 2017 12:37 AM

पोलिसांचा धाक संपला : बंदिस्त मार्केटमध्ये होणा:या चो:यांनी आश्चर्य, गस्त ठरतेय नावालाच

भुसावळ : शहरात चोरटय़ांचा उच्छाद कायम असून आठवडाभरात बंदिस्त मार्केटमध्ये चौथे दुकान फुटल्याने व्यावसायिकांमध्ये मोठी घबराट पसरली आह़े पोलिसांची गस्त तोकडी ठरत असून चोरटे शिरजोर झाल्याचे चित्र आह़े शहरातील चुडी मार्केटमधील जनरल स्टोअर्स फोडून चोरटय़ांनी सौंदर्य प्रसाधनांसह लाखोंचे साहित्य लांबवल़ेविशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्ही नसलेले व बंदीस्त मार्केटची दिवसा ेटेहळणी करीत असून रात्री काम फत्ते करीत आहेत़बंदीस्त मार्केटमध्ये चोरीशहरातील शहिद अब्दुल हमीद चुडी मार्केटमधील सय्यद सादीक सैय्यद हारुण यांच्या मालकीचे पाकिजा दुल्हन बँगल्स जनरल स्टोअर्स गुरुवारी मध्यरात्री चोरटय़ांनी फोडल़े हे मार्केट बंदिस्त असतानाही चोरटय़ांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून प्रवेश करीत दुकानाचे कुलूपे तोडली़ दुकानातील  20 हजारांची रोकड, चायना मोबाईल, ब्लू टुथ स्पीकर, डिओ, श्ॉम्पु, व्हॅसलीन, ज्वेलरी डायमंड सेट तसेच महागडा दुल्हन साज, डायमंड बांगडय़ा तसेच महागडी सौंदर्य प्रसाधने मिळून एकूण एक लाख 70 हजारांचा ऐवज लांबवल्याचे दुकानदाराने सांगितल़ेगुरुवारी सकाळी स्वच्छता कर्मचारी चुडी मार्केटची स्वच्छता करीत असताना त्यास चोरी झाल्याचे लक्षात आल्याने दुकान मालकास कळवण्यात आल़े बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे व डीबी कर्मचा:यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली़सीसीटीव्ही नसलेले मार्केट टार्गेटशहरात आतार्पयत झालेल्या चो:यांमध्ये सीसीटीव्ही नसलेल्या व्यापारी संकुलांना चोरटय़ांनी टार्गेट केले आह़े व्यापारी लाखो रुपयांच्या गाळ्यांमध्ये सीसीटीव्ही बसवत नसल्याने चोरटय़ांना आयतेच कोलीत मिळत आह़े पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांसह व्यापा:यांकडून होत आह़े पंधरवडय़ात चार दुकानांसह एक घरफोडी 4नववर्षाच्या प्रारंभीच चोरटय़ांनी छबीलदास मार्केटमधील तीन दुकाने फोडून थर्डीफस्ट साजरा केला होता़  चोरटय़ांनी श्रीचंद भागचंद बोगीया यांच्या राधाकृष्ण होजिअरी दुकानाचे कुलूप तोडून सुमारे 300 रुपयांची चिल्लर तसेच एक हजारार्पयतची रोकड तसेच पहेलाज मूलचंदानी यांच्या रुपचंद गुरुबक्षमल क्लॉथ स्टोअर्समध्येही चोरटय़ांनी आठ हजारांची रोकड लांबवली तर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील रवी उत्तमचंदानी यांच्या राजयोग ब्युटी कलेक्शनचे कुलूप  चोरटय़ांनी तोडले मात्र काहीही ऐवज चोरीला गेला नाही, असे दुकानदाराने सांगितल़े4शहरातील नेब कॉलनीतील रहिवासी महेंद्र बाबूलाल जैन हे राजेश्वर नगरातील भावाकडे कुटुंबासह शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी जेवायला जाताच चोरटय़ांनी घरफोडी करीत  85 हजारांची रोकड, एक किलो चांदी, सोन्याचे शिक्क्यांसह एक लाख 62 हजारांचा ऐवज लांबवला होता़ पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह !4शहर, बाजारपेठ हद्दीत सुरू असलेल्या चो:या, घरफोडीनंतर पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आह़े पोलिसांची गस्त तोकडी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आह़े4जंक्शन स्थानक असल्याने शेकडो गाडय़ांमुळे चोरटे रात्रीतून येवून काम फत्ते करून निघून जातात़ पोलिसांना मात्र त्याची साधी भनकही लागत नाही़ वाढत्या चो:यांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून व्यापारी, व्यावसायिकदेखील धास्तावले आहेत़वाढत्या चो:यांच्या पाश्र्वभूमीवर गस्त वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत़ चोरटे बहुधा बाहेरील असावेत़ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तसेच संशयीतांची माहिती काढून चोरटय़ा उघडकीस आणण्यात येतील़-नीलोत्पल, सहाय्यक पोलीस अधीक्षक, भुसावळ