शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

साहित्य संमेलनासाठी तुटपुंजे अनुदान नको, शाश्वत निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:46 AM

चाळीसगाव येथे प्रकट मुलाखतीत डॉ.श्रीपाद जोशी यांची अपेक्षा

चाळीसगाव, जि.जळगाव : एकीकडे तुटपुंजे अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे साहित्य महामंडळाची माहितीही मागायची, ही दुटप्पी भूमिका असून, महामंडळाला शाश्वत निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केली.चाळीसगाव येथील महाराष्ट साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे वाणी मंगल कार्यालयात शनिवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप होते. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, विश्वस्त डॉ. सुनील राजपूत उपस्थित होते.मराठी माणसाने भाषा, साहित्य, संस्कृती राक्षणासाठी खिशातून पैसे काढावे, जोपर्यंत हे होत नाही, तोवर शासनाकडे निधी मागण्यासाठी पदर पसरवाच लागेल, अशी खंतही डॉ. जोशी त्यांनी बोलून दाखवली. अशोक वाबळे आणि प्रा. तुषार चव्हाण यांनी विविधांगी प्रश्नांची मांडणी करुन डॉ.जोशी यांना बोलते केले.बदल घडतोच. मात्र त्याची दिशा सकारात्मक असायला हवी, असे सांगत डॉ.जोशी यांनी गेल्या ५० वर्षात साहित्य महामंडळात जे काम झाले नाही, ते आपल्या अडीच वर्षाच्या काळात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोबिंवलीचे साहित्य संमेलन दर्दींच्या गदीर्ने यशस्वी झाले. संमेलनात युवा, स्त्रिया, दलित, आदिवासी यांना स्थान दिल्यानेच हे घडू शकले, असे ते म्हणाले. या वेळी किसनराव जोर्वेकर, अरुण भावसार, डॉ.विनोद कोतकर, उ.भ.काळे, जयसिंग बागुल, सुभाष कारवा, विजय पाटील, गणेश आढाव, अण्णा धुमाळ, अ‍ॅड. सुषमा पाटील, प्राचार्य पी.एस.चव्हाण, कवी गौतम निकम, मनोहर आंधळे, रमेश पोतदार, प्रतिभा बागुल, राकेश बोरसे, शालिग्राम निकम, रामचंद्र गोसावी, संगिता देव, बी.एल.ठाकरे आदी उपस्थित होते.म्हणून निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतलासाहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला. त्यामुळेच निवडणुक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलनाच्या २० घटक संस्थांनी सुचविलेल्या २० नावांमधून एकाची अध्यक्षपदी निवड केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.मसापचे कार्य प्रागतिक झाले आहे. याचा दाखला देतानाच ज्याला डोकं नाही तो वाद घालणार नाही. वाद जरुर घाला. मात्र अगोदर वाद घालण्याइतके समृद्ध व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.मराठीची होतेय कुचुंबणासमाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून साहित्याकडे पहावे, असे उद्बोधन करताना एका प्रश्नांच्या उत्तरात डॉ.जोशी यांनी मराठी भाषेच्या गळचेपी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ब्रिटीशकालिन शिक्षण पद्धतीमुळे मराठी भाषेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अमेरीका, इंग्लंड सारख्या देशांबरोबर शासन व्यवस्थेने करार केले आहेत. त्यामुळे इंग्रजीला प्राधान्य मिळते. मराठी भाषेची कुचंंबणा होते. एकट्या मुंबईत ३४ मराठी शाळा बंद पडल्या असून, हे दुर्देैवी आहे.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव