शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नको व्यासंग, करा सत्संग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:06 AM

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात प्रा.अनिल सोनार यांचा लेख ‘नको व्यासंग, करा सत्संग’

‘हटातटाने पटा रंगवुनी, जटा धरशी का शिरी? मठाची उठाठेव का तरी’ ह्या फटक्यातून शाहीर राम जोशींनी ‘मठाची उठाठेव’ करणा:यांना फटकून काढलं असलं तरी ते कविवर्याचं अज्ञान होतं. मठाच्या ‘उठाठेवी’ला आजच्या भाषेत ‘सत्संग देणे’ म्हणतात. मठात येणा:या सेवक:याला ‘भवतापा’पासून दूर नेऊन ‘आत्मसुखाची हुडहुडी’ अनुभवून देणे हे सोपे नोहे. साक्षात सौंदर्योपभोगी देवेंद्रालासुद्धा हेवा वाटावा, असे ह्या अवतारी पुरुषांचे भाग्य असते. कारण त्यातले बहुतेक साक्षात ‘ययाती’चे अवतार असतात. ह्या थोर ‘अध्यात्म गुरूं’कडे सुंदर सुंदर तरुण ियांचे तारुण्य स्वत: होऊन चालून येत असते. मग काय, कोमल ह्रदयी मठपतींना त्यांच्या उद्धाराचे कार्य करण्यासाठी, नाईलाजाने पुन्हा तारुण्य स्वीकारावेच लागते. पण पामर जनास हे उमजेल तेव्हा ना! झोपलेल्या शिष्येला केवळ धीर देत, ‘भिऊ नकोस मी तुङया खाटेशी आहे’ हे सांगायला गेलेल्या अध्यात्मगुरुला, नतद्रष्ट पोलिसांनी तुरुंगात की हो नेऊन टाकले. मी त्या अधिका:याला विचारलं, ‘हा बुवा असा आहे, हे तुम्हाला आधी माहीत नव्हतं का?’ त्यावर तो म्हणाला, ‘ङिारपते कशी ही लाळ गळल्यावर कळले होते, तो संतच लंपट होता, चळल्यावर कळले होते.’ एका शिष्याला मी विचारलं, की पोलीस अधिका:याची प}ी दर्शनाला आलेली असूनही, हे कसं घडलं? यावर तो शिष्य लाजत सांगू लागला, ‘खडखडले खडाव पायी, धडधडली छाती तैसी, तो पदर रेशमी होता, ढळल्यावर कळले होते.’ मंदिराचा पुजारी ताडकन् म्हणाला, ‘ती पोर लकाकत आली, संतास दुभंगून गेली, तो संतही तप्तच होता, चळल्यावर कळले होते.’ मी त्या पोलीस अधिका:याला म्हणालो, ‘तुमच्यासारखे उच्च शिक्षित ह्यांच्या गळाला कसे काय लागतात हो?’ तो अधिकारी संतापून म्हणाला, ‘स्वयं म्हणे मनूचा मासा, त्राताच जगाचा आहे. तो होता बोंबील साधा, तळल्यावर कळले होते.’ मठपती तर गजाआड गेला. पण हजारो एकरावर पसरलेले त्याचे मठ, त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या शिष्यांनी गजबजलेले असतात. कारण - सेवेत शिष्य जे होते, ते लेचे पेचे नव्हते, ते होते दगडी दाणे, दळल्यावर कळले होते.’ शाहीर कविराय राम जोशींनी ‘पटा’ला रंगवून ‘जटा’शिरी का धरतोस, असा फटका मारला असला तरी तुम्ही पांढरा चोगा किंवा भली मोठी दाढी, आणि डोक्यावर केसांचं जंजाळ वाढवून, कपाळावर गंध ¨बद लावून, गावातून भटकून या. शेकडो लोक तुमच्या पाया पडतात की नाही ते बघा. सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या, भूतपूर्व साक्षात्कारी संत श्रीश्रीश्री फोकाराम दंडेवाले यांना मी जेल मधे जाऊन विचारलं, की तुम्ही ह्या संतपणाच्या धंद्यात कसे आलात, आणि कधीपासून आलात? तर फोकाराम हसत म्हणाले, ‘कसे आलात म्हणाल तर दाढीमिशा वाढवून आलो आणि कधी आलात म्हणाल तर, दाढीमिशी ब:यापैकी वाढल्यापासून आलो. दाढी आणि डोक्यावरचे केस वाढवले आणि चमत्कार झाला.’ पाच खून, सात दरोडे आणि नऊ बलात्काराच्या गुन्ह्यात खडी फोडत असलेल्या गजाआडच्या फोकारामांनी दोन दगडांच्या चिपळ्या करून आत्मकथा सांगायला सुरुवात केली, समजून संत मजला पाया पडून गेले, ते हात कायद्याचे मजला विकून गेले आलेत जोखण्याला संतत्व आज माङो, येऊन फक्त माझी दाढी बघून गेले सा:यांस ज्ञात झाली माझी अघोर कृत्ये, मी ‘धर्म’ बोललो अन् सारे धकून गेले