चंद्रशेखर जोशीजळगाव : सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीत अनेक बदल केले पण त्या तुलनेत रेशन व्यावसायिकांचा विचार केला नाही. आम्ही कुठल्याच धोरणांना विरोध करणार नाही, आम्हाला पगार सुरू करा पण तेदेखील हे सरकार मानत नाही. शासनाच्या या धोरणांना आमचा विरोध असल्याची भूमिका आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनचे राष्टÑीय उपाध्यक्ष तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारकांचा मोर्चा व मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रल्हाद मोदी करणार आहे. मंगळवारी रात्री ते शहरात दाखल झाले असता ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.थेट लाभ हस्तांतरणाला विरोध नाहीसरकारने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) चे धोरण अवलंबिले आहे त्याला आमचा विरोध नसल्याचे सांगताना मोदी म्हणाले, वितरणात आम्ही गडबडी करतो या शंकेतून सरकार हे धोरण अवलंबिते आहे. मात्र त्यात फारसे तथ्य नाही, या व्यवसायाबद्दल गैरसमज जास्त आहे. शासनाने हे धोरण अवलंबिले तर आम्ही काय करायचे? शासनाचा कचरा विकायचा काय? असा सवाल करून ते म्हणाले, आम्ही हा व्यवसाय करतो तो पोटासाठी तेच भरत नसेल तर काय करायचे.शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीबाबत मोदी म्हणाले, ब्रिटीश काळापासून हे धोरण आहे. गोरगरीबांना पूर्वी रेशनवर ३२ वस्तू मिळत. पूर्वी मोठमोठे ट्रक भरून माल रेशनवर येत असे. तो व्यवसाय करणाऱ्याची ओळख शेठ म्हणून होती. आलेला माल ठेवायला मोठे. गोडाऊन लागत असे मात्र आज परिस्थिती अशी झाली आहे की केवळ २ वस्तू तांदूळ व गहू वितरीत होतो. तोदेखील चांगला नसतो. मग शासनाचा केवळ कचरा आम्ही वितरीत करायचा काय? आमचा दुकानदार उपाशी मरतोय पण सरकार धोरण बदलायला तयार नाही. बायोमॅट्रीक प्रणाली आणली, पॉस मशिन आणले या बदलांनाही आमचा विरोध नव्हता व नाही.पण आमच्या रोजी-रोटीचा विचार केला पाहीजे ही माफक अपेक्षा आहे. सरकार दरबारी भूमिका मांडण्यासाठी ग्राहकांना बरोबर घेऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत. न्यायाची ही भूमिका शासनाने समजून घेऊन व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.पंतप्रधानांचा भाऊ म्हणून नाही एक रेशन दुकानदारांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय...रॉकेल बंद धोरणात सरकारच्या नियतीत खोट असल्यासारखे आहे. येणाºया काळात रॉकेल ६२ रूपये किलोने मिळेल हे लक्षात घ्यावे. आपण पंतप्रधानांचे भाऊ आहात सरकारच्या धोरणाबात काय सांगाल यावर मोदी म्हणाले, मी पंतप्रधानांचा भाऊ म्हणून येथे आलेलो नसून रेशन व्यावसायिकांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. नरेंद्र मोदी यांचे क्षेत्र राजकीय आहे. मी एक व्यावसायिक आहे. कुटुंबाबाबत येथे काही बोलणे मला योग्य वाटत नाही.
थेट लाभाला विरोध नाही मात्र रेशन दुकानदारांनी पोट भरायचे कसे? - पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:31 PM
शासनाच्या बदलत्या अन्यायकारक धोरणांना विरोध
ठळक मुद्देदुकानदारांनी आता काय शासनाचा कचरा विक्री करायचा का?थेट लाभ हस्तांतरणाला विरोध नाही