वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : कोणत्याही नवीन बांधकामासाठी गावविहिरीतील पाण्याचा वापर करू नये, असा ठराव येथे झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.वरखेडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा धनराज पाटील होत्या. ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी प्रोसिडिंग वाचन केले. चालू स्थितीत गावाला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईबाबत विषय हाताळण्यात आला.यावेळी असे ठरले की येथील बहुळा नदीपात्रात असलेल्या विहिरींना खोल करून त्यांचा वापर सुरू करण्यात यावा याविषयी सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. गावात कुठल्याही नवीन बांधकामासाठी गावातील कोणत्याही विहिरीवरून पाण्याचा वापर करू नये. ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करावा, असेही आवाहन करण्यात आले.रेशन दुकानदार पूर्ण धान्य देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. यावेळी उपसरपंच संतोष पाटील, माजी सरपंच धनराज विसपुते, सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील, गजानन पाटील, डॉ.जितेंद्र चौधरी, राकेश पाटील, भरत पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र जगताप, मुख्याध्यापक एकनाथ देवरे, रतन पाटील, पंडित चौधरी, डॉ.धनराज पाटील, अमोल पाटील, प्रशांत पाटील, काशिनाथ सुरवाडे, दीपक शिरसाठ, दीपक पाटील, निंबा भोई, वसंत पाटील, दुर्गादास सोनार, ग्राम पंचायत लिपीक शेनफडू बोरसे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
नवीन बांधकामासाठी विहिरीचे पाणी वापरू नये, वरखेडी ग्रामसभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 2:56 PM
कोणत्याही नवीन बांधकामासाठी गावविहिरीतील पाण्याचा वापर करू नये, असा ठराव वरखेडी येथे झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.
ठळक मुद्देवरखेडी ग्रामसभेत पाणीटंचाईवर चर्चाबहुळा नदीपात्रातील विहिरींना खोल करून त्यांचा वापर सुरू करण्यात यावारेशन दुकानदार पूर्ण धान्य देत नसल्याची तक्रार