महिला कंडक्टरला प्रवाशांचे धक्के खात आपले कर्तव्य पार पाडावे लागते. रात्री अपरात्रीची ड्युटी...सोबत कौटुंबीक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात. अशा अनेक अडचणींना तोंड देत तारेवरची कसरत करावी लागते...असे बोल आहेत महिला कंडक्टरांचे. महिला दिनानिमित्त बस स्थानकात काही महिला कंडक्टरांसोबत संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. ती त्यांच्याच शब्दात...एक व्यक्ती कंडक्टरच्या सीटवर बसला. जागा नसल्यामुळे मी त्याला बसू दिले. त्याच्याच बाजूला कोपºयात मी बसले. तो अश्लील चित्र पाहत होता. त्याबाबत त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली असता तो हमरीतुमरीवर आला. अशा वेळी प्रवाशांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. कुणीही मदत केली नाही. तो शिव्या द्यायला लागला. माझे केस ओढले, घट्ट पकडून ठेवले. यामुळे मला खूप राग आला आणि मी बस पोलीस स्टेशनला घेऊन गेली. त्यावर कायदेशीर कारवाई केली.कोणी एक-दोन रुपयावरून , सुट्ट्या पैशांवरून, चढण्या-उतरण्यावरून वाद घालतात. तसेच सुशिक्षित तर भांडतातच पण खेड्यातील वृद्ध प्रवासी सुट्टे पैसे दिले नाही तर काहीही बोलतात. वरिष्ठ अधिकाºयापर्यंत तक्रारी नेतात तेव्हा वरिष्ठ अधिकारी देखील महिला कर्मचाºयांच्या बाजूने बोलत नाही. प्रवाशांचेच ऐकले जाते. महिला प्रवासी सुध्दा उद्धटपणे बोलतात. सुशिक्षित महिला समजून घेतात.नोकरी करायची असेलतर आम्हाला आमच्या हिमतीवर नोकरी करावी लागते. एखाद्या वेळेस घरचे सुध्दा साथ देत नाहीत. काही वेळेला बसमध्ये बिघाड झाला तर ड्यूटी संपली तरी बस दुरुस्त होते तोपापर्यंत त्याठिकाणी थांबावे लागते. रात्रीचे नऊ-दहा वाजतात. महिला कर्मचारी म्हणून देखील लवकर जाऊ दिले जात नाही. अशा वेळी मुलाच्या जेवणाचा, घराचा विचार डोक्यात येऊन नकोशी वाटते नोकरी, पण घरची परिस्थिती, गरज यामुळे ड्यूटी करावी लागते.काही प्रवासी तर मी पोलीस आहे. अधिकार आहे असे सांगून खोटी कागदपत्रे दाखवून फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस शिस्त दाखवून तिकीट काढावे लागते. अन्यथा तो भूर्दंड आम्हाला बसतो.कधी कधी तिकीट काढण्याचे मशीन खराब होते. तेव्हा देखील प्रवासी आमच्या नावाने ओरडतात, काही जण दादागिरी करून फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात, का तर महिला कंडक्टर आहे, काही करू शकणार नाही. अशा वेळेस खंबीर उभे राहून नोकरी करावी लागते कधी कधी रडायला पण येते.ड्यूटी लावताना पण वरिष्ठ अधिकारी महिलांना दिवस संपण्याअगोदरच्या ड्यूट्या लावत नाही. त्यांच्या मर्जीतल्या पुरुष कर्मचाºयांना दिवसाच्या ड्यूट्या लावतात. काहींची लहान मुले घरी असतात त्यांना जर सतत ती लवकर जाण्याची ड्यूटी लावली तर पुरुष कंडक्टरच्या जीवावर येते. तसेच महिलांचे मासिक पाळीच्या वेळेसची ड्यूटी नकोशी वाटते. त्यावेळेस सतत उभे राहणे, दगदग सहन होत नाही पण तरीही आम्ही कर्तव्यदक्ष ड्यूटी बजावत असतो.बºयाच वेळेला या धावपळीमुळे मुलांकडे, घराकडे दुर्लक्ष होते. सुट्ट्याही फार कमी असतात. जास्त सुट्ट्या झाल्या तर पगार कापला जातो. त्यामुळे मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही. त्यांची हौसमौज पूर्ण करता येत नाही. स्त्री समानता म्हटली जाते पण कधी कधी विचार येतो की खरच आजही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन तोच आहे जो पूर्वी होता.अशा प्रकारे या भगिनींचे अनुभव ऐकल्यावर वाटते, समानता फक्त कायद्यातच नका राहू देऊ.-प्रा़डॉ.सुषमा तायडे
कंडक्टरची ड्यूटी नकोशी वाटते मात्र पोटासाठी नाईलाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:06 PM