ऑटो चालक - गेल्या दीड वर्षांपासून व्यवसाय मंदावला असून दररोज ग्राहक मिळण्यासाठी मोठी वाट पहावी लागते. त्यामुळे व्यवसाय नसताना कर कसा भरणार.
भाजीपाला विक्रेता- भाजीपाला व्यवसायात मोठी स्पर्धा वाढली आहे. व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही. कर भरावा लागेल, एवढा व्यवसाय होत नाही.
फेरीवाला - आज कॉलन्या-कॉलन्यांमध्ये फिरून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज दारोदार फिरत असलो तरी पाहिजे तसा व्यवसाय होत नाही. त्यातून कर काय भरणार.
सिक्युरिटी गार्ड - आपल्याला मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा-बसा केला जातो. त्यात कर भरण्याचा विषय येतच नाही.
साफसफाई कामगार - सुरुवातीपासूनच साफसफाई कर्मचाऱ्यांना कर भरावा एवढा मोबदला मिळत नाही. पगार वाढल्यास व करासाठी पात्र ठरलो तर नक्की कर भरू.
सलून चालक - कोरोनामुळे अजूनही अनेक जण सलूनच्या दुकानावर यायला घाबरतात. कटींग करण्याचा कालावधी अनेकांना वाढविला असून पूर्वी प्रत्येक जण महिनाभरात दाढी-कटींगसाठी येत होता. आता दोन कटींगमधील अंतर दीड ते दोन महिन्यांवर गेले आहे.
लॉन्ड्री चालक - संसर्गाच्या भीतीने अनेक जण लाँड्रीवर कपडे धुण्यासाठी नाही की इस्त्री करण्यासाठी आणत नाही. कर भरण्याएवढा व्यवसाय होत नाही.
घर काम करणाऱ्या महिला - सुरुवातीपासूनच पगार जास्त मिळत नाही. त्यात कोरोनामुळे अनेक घरचे काम गेले आहे. उत्पन्नच तेवढे नसल्याने कराचा प्रश्नच नाही.