जळगाव : बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून ओंकारनगरातील विलास दिनकर भोळे या डॉक्टराला चोरट्यांनी ४९ हजार ९०० रूपयांचा आॅनलाईन गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे़ याबाबात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़भोळे हे दवाखान्यात असताना त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला व बँक खात्याची माहिती विचारली़ यावर विश्वास ठेवत भोळे यांनी खात्याची पूर्ण माहिती दिली़ त्यानंतर ओटीपी क्रमांक देखील सांगितला़ अखेर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बँकेत गेल्यावर ४९ हजार ९०० रूपये मुंबई, बंगलोर, नोएडा व दिल्ली या ठिकाणावरील वेगवेगळ्या खात्यावर जमा झाल्याचे दिसून आले़ फसवणूक झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, अतुल प्रभाकर मारकड (रा.शिवकॉलनी) याला एटीएम कार्डची माहिती विचारुन ५६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
जळगावात बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून डॉक्टरची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:55 PM