शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

डॉक्टरांचा कडकडीत बंद

By admin | Published: March 24, 2017 12:28 AM

आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जळगाव : डॉक्टर व रुग्णालयांवर होणारे हल्ले थांबावेत व त्यांच्या सुरक्षेविषयीच्या मागण्या मान्य होत नसल्याने  पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होत जिल्ह्यातील डॉक्टरांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचा हा दुसरा दिवस होता. यामध्ये जिल्ह्यातील १५०० डॉक्टर सहभागी होत ११०० रुग्णालय आज बंद होते. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले.    औषधी दुकानेही दुपारपर्यंत बंद असल्याने रुग्ण ताटकळले होते. या बंदला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, गुरुवारी या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) बैठक होऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात येणार आहे.  या मोर्चामध्ये डॉक्टरांसह केमिस्ट असोसिएशन आणि  वैद्यकीय प्रतिनिधीही सहभागी होणार आहे. धुळे येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पुन्हा मुंबई येथे डॉक्टरांवर हल्ला झाला. या घटनेमुळे  राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. मात्र सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने व डॉक्टरांवर हल्ले सुरूच असल्याने या बंदमध्ये आयएमएदेखील सहभागी झाली असून बुधवार दुपारपासून जिल्ह्यातील रुग्णालये बंद ठेवण्यात आले आहे. अनेक रुग्ण माघारी परतलेरुग्णालय बंद असल्याचे पाहून नाईलाजास्तव अनेक रुग्ण लगेच माघारी परत होते. एका अत्यवस्थ असलेल्या रुग्णास खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले मात्र बंद असल्याने रुग्णावर उपचार होवू शकले नाहीत. त्यामुळे रात्री साडे नऊ वाजता               जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही उपचार न झाल्याने मुंबई येथे तातडीने हलविण्यात आले. या बंदमध्ये ओपीडी, शस्त्रक्रिया बंद असल्याने आलेल्या गंभीर रुग्णाला केवळ अत्यावश्यक सेवा म्हणून प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता. बंदमुळे जिल्हा रुग्णालयात अधिक रुग्ण येण्याची शक्यता होती. मात्र जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या नियमित होती.आयएमएच्या बैठक़ीत संप यशस्वी करण्याचा निर्धाऱ़ बंद संदर्भात गुरुवारी आयएमएची बैठक झाली. यामध्ये हा संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ. प्रताप जाधव, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हाभरातील डॉक्टर उपस्थित होते. आज सकाळी ११ वाजता मोचाऱ़़़् डॉक्टरांच्या मागण्या मान्य होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ व म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयएमएच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आयएमए सभागृहापासून मोर्चास सुरुवात होईल. गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर उपचाररुग्णालये बंद असल्याने तर काही रुग्णांवर प्रथमोपचार करून दुसरीकडे पाठविले जात असल्याने अनेक रुग्ण गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पोहचले. त्यामुळे सोनोग्राफी, एमआरआय, एक्स-रे करणाºया रुग्णांची संख्या अधिक होती. प्रसूतीसाठी अनेक महिला दाखल झाल्या.  त्यामुळे रुग्णांना तेवढा दिलासा मिळाला. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढणार असल्याच्या शक्यतेने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन सज्ज असून वाढीव उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच रजेवर असलेल्या डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.