शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

आयोगाच्या नकारानंतरही पुरविली गेली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:47 PM

महिला अधिकाऱ्यांचा तक्रारीत आरोप : प्रशासनातील ‘ते’ हितशत्रू कोण?

जळगाव : माहिती अधिकार कायद्यांतर्गत काही माहिती पुरविण्यास केंद्रीय आयोगाने स्पष्टपणे नकार दिल्यानंतरही प्रशासनातील काही हितशत्रूंनी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्याशी संगनमत करुन त्यांना कागदपत्रे पुरविली असल्याचे महिला अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्याविरुध्द दिलेल्या विनयभंग व खंडणीच्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीत तथ्य असेल तर महसूल विभागात या महिला अधिकाºयांचे ते हितशत्रू कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.महिला अधिकारी व दीपक गुप्ता यांच्यातील तक्रारीच्यानिमित्ताने महसूल विभागातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. प्रशानातील काही हितशत्रू हे दीपक गुप्ता यांना मिळाले असून त्यांनीच कार्यालयीन गोपनीय कागदपत्रे गुप्ता यांना पुरविले असून या कागदपत्रांच्या आधारावरच गुप्ता आपली बदनामी करीत असल्याचा उल्लेख अधिकाºयांनी तक्रारीत केला आहे. आपल्यावर कुठलेही आरोप सिध्द झालेले नसताना समाज, जनमानसात व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांमध्ये बदनामी होण्याच्या उद्देशाने गुप्ता हे कागदपत्रे सोशल मीडियावर अपलोड करीत आहे. या मागील उद्देश खंडणी मागण्याचाच असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.एप्रिल महिन्यातही गुप्तांविरुध्द तक्रारराष्टÑीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य मिळावे यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी काही जणांनी जोरजोराने आरडाओरड व लोकांना भडकावून तहसीलदारांना धक्काबुक्की करुन व्हीडीओ चित्रण केल्याचा आरोप होता. त्यातील शेख युनुस शेख अजिज (३२, रा.उस्मानिया पार्क, जळगाव) व कैलास महारु सोनवणे (५०, रा.मोहाडी, ता.जळगाव) या दोघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तहसीलदारानीच स्वत: फिर्याद दिली होती. त्याच प्रकरणात तहसील कार्यालयात गर्दी करुन संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्यासह १५० ते २०० जणांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात झाला होता. निवासी नायब तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांनी फिर्याद होती.गुप्तांविरुध्द दीड महिन्यातील दुसरा गुन्हादीपक गुप्ता यांच्याविरुध्द दीड महिन्यात शहर पोलीस ठाण्यात हा दुसरा गुन्हा दाखल झाला. याआधी २० जून रोजी वाळू व्याससायिकाडून १ लाख ७० हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात विठ्ठल भागवत पाटील (३२, रा.ज्ञानदेव नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली. आता ७ जुलै रोजी सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट टाकणे व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांपैकी एकाही गुन्ह्यात गुप्ता यांना अटक झालेली नाही. दरम्यान, महिला अधिकाºयांच्या या तक्रारीत गुप्ताविरुध्द याआधी जळगाव, धुळे, नाशिक, सीबीडी नवी मुंबई व पुणे पोलिसात अश्लिल शेरेबाजी केल्याचे गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख आहे. या गुन्ह्यांमध्ये गुप्ता यांना अटक झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव