भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे शेत शिवारात कुत्र्यांनी हरिणाचा फडशा पाडल्याची घटना १४ रोजी दुपारी उघडकीस आली.समाधानकारक पावसामुळे साकेगाव शेतशिवीरांमध्ये वन्यप्राण्यांसाठी चाऱ्याची सोय झाली आहे. यामुळे या भागांमध्ये हिरणच्या झुंडच्या झुंडच्या फिरताना निदर्शनास येतात. कुत्र्यांनी मादी जातीच्या तीन वर्षाच्या भेडकी जातीच्या हरीनचा लचका तोडला आहे. ही घटना १४ रोजी दुपारी उघडकीस आली. नेमका कुत्र्याने लचका तोडला की इतर हिंस्त्र प्राणीने त्याच्यावर घात केला. याच्यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत.दरम्यान, वनपाल एल.डी. गवळी, नरेंद्र बारी, भास्कर पाटील, शिवदास जाधव यांनी मृत हरणाचा पंचनामा केला.साकेगाव शिवारामध्ये जोगलखेडा, भानखेडा, तसेच तापी पात्र, वनविभाग, वांजोळा परिसर, रेल्वेला लाईनला लागून असलेल्या परिसरामध्ये हरणाचे व नील गायच्या कडप दिसून येत आहे. नील गायी शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान करता आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात कुत्र्यांनी पाडला हरिणाचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 9:29 PM