वरखेडी, ता.पाचोरा : भोकरी, ता.पाचोरा शेत शिवारात पाण्याच्या शोधार्थ भटकणाºया मादी हरणास कुत्र्यांनी घेरून ठार केले व नंतर तिचे लचके तोडले. ३१ मे रोजी सकाळी ५:४५ वाजता ही घटना घडली.सकाळी वरखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील, सुनिल पांडे, राजू धोबी व विलास मिस्तरी हे डांभुर्णी रोडने मॉर्निंग वाक व योगासने करण्यासाठी नित्यनियमाप्रमाणे जात असताना त्यांच्याजवळून एक हरीण धावत गेली व पुढे गेल्यानंतर कुत्र्यांनी तिला घेरले व यातच तिचा मृत्यू झाला.ही घटना पाचोरा परिक्षेत्राचे वनपाल एस.टी.भिलावे यांना कळविल्यानंतर त्यांनी ताबडतोब वनरक्षक सुरेश काळे व वनमजूर श्रावण पाटील यांना याठिकाणी पाठविले.त्यांनी या मृत हरणाची विल्हेवाट लावली.दरम्यान पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी भटकंती करतांना गावालगतची मोकाट कुत्रे हे समुहाने या प्राण्यांवर हल्ला चढवून त्यांना जीवे ठार मारत असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवीताला धोका निर्माण होत आहे.वन विभागाने वनक्षेत्रातील पाणवठ्यांमधे पाण्याची व्यवस्था करावी.
पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या हरणास कुत्र्यांनी केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 3:27 PM